Wednesday, October 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तुषार आपटे यांच्या स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा घेण्याचा भाजपचा निर्णय.

 

वाढता जनक्षोभ आणि विरोधकांच्या टीकेमुळे मोठा दबाव

ठाणे: प्रतिनिधी

शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे शिक्षण संस्थेचे सचिव तुषार आपटे यांचा बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.

आपटे यांच्या स्वीकृत सदस्य पदाला बदलापूरकरांचा प्रचंड विरोध आणि विरोधकांकडून केली जाणारी टीका यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ठाणे जिल्हा भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

बदलापूर येथील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केले होते. त्याचा चकमकीत मृत्यू झाला. त्याला पाठीशी घालत असल्याचा गुन्हा दाखल करून आपटे यांनाही अटक करण्यात आली. याच आपटे यांना भाजपने नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य पद दिले आहे. मात्र, वाढत्या जनक्षोभामुळे हा निर्णय रद्द करण्याची पाळी पक्षावर आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading