गणेशोत्सव पार पडेपर्यंत जरांगे यांनी थांबावे – नवनीत राणा
अमरावती: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव पार पडेपर्यंत मुंबईत आंदोलनाचा आग्रह धरू नये. न्यायालयीन आदेशाचे पालन करून त्यांनी गणेशोत्सवानंतर आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवावा, असा सल्ला नवनीत राणा यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आहे. राज्यभरात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि उत्साह असतो. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक तिथे येत असतात.
गणेशोत्सवाचे ११ दिवस सोडून जरांगे पाटील केव्हाही आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात. त्यांनी हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणात विघ्न ठरू नये,असेही नवनीत राणा म्हणाल्या.
