Wednesday, September 16, 2026
BusinessLatest News

पुण्यात ‘मंकी शोल्डर’अल्टिमेट बारटेंडर चॅम्पियनशिपचे आठवे पर्व उत्साहात संपन्न

 

पुणे :सात यशस्वी पर्वानंतर ‘विल्यम ग्रँट अँड सन्स’ या संस्थेच्या मंकी शोल्डर या सुप्रसिद्ध ब्लेंडेड मॉल्टने ‘अल्टिमेट बारटेंडर चॅम्पियनशिप’ (UBC) चे आठवे पर्व पुण्यात नुकतेच संपन्न झाले. या पर्वातील पाचवे शहर-पट पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी कोरेगाव पार्क येथील पिमलिको येथे पार पडली.या स्पर्धेत पुण्यातील तब्बल १३५ हून अधिक बारटेंडरनी उत्साहात भाग घेतला. बारटेंडर रंबल या स्वरूपात सहभागींची बारमधील खरी कसोटी घेण्यात आली. ओतणे, सुगंध ओळखणे, मिक्सिंग कौशल्य, प्रॉडक्टची माहिती तसेच परफेक्ट सर्व्ह करण्याची कला या सर्व कौशल्यांवर आधारित कसोट्या घेण्यात आल्या.पुण्यातील कॉब्लर अँड क्रू येथील तनिष आणि क्वोरा येथील दिनेश हे दोघे विजेते ठरले असून आता ते राष्ट्रीय अंतिम फेरीत इतर शहरांच्या विजेत्यांसोबत स्पर्धा करणार आहेत.

यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन भारतातील बार इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व पंकज बालाचंद्रन यांनी केले. पुणे फेरीबाबत बोलताना ते म्हणाले, “यंदा विशेष होस्ट म्हणून युबीसी मध्ये पुन्हा सहभागी होणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मंकी शोल्डर हा बारटेंडरमध्ये प्रचंड लोकप्रिय ब्रँड आहे. या वर्षी उमेदवारांची संख्या आणि त्यांचे कौशल्य पाहून मी भारावून गेलो. ही स्पर्धा आता बारटेंडिंगच्या कलेचा उत्सव बनली आहे.”

विल्यम ग्रँट अँड सन्स इंडिया यांच्या मार्केटिंग प्रमुख कपिला सेठी कड म्हणाल्या, “मंकी शोल्डर अल्टिमेट बारटेंडर चॅम्पियनशिप हे बारटेंडर समुदायातील कौशल्याला वाव देण्याचे आणि संधी निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे. आठव्या आवृत्तीत आम्ही पुढच्या पातळीवर जात आहोत. राष्ट्रीय विजेता आता टोकियोमध्ये होणाऱ्या आशियाई अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुण्याने या पर्वाची शानदार सुरुवात करून दिली आहे.”

या चॅम्पियनशिपचे पुढील फेऱ्या मुंबई, गोवा आणि गुरुग्राम येथे होणार असून सप्टेंबरमध्ये भारताची अंतिम फेरी पार पडणार आहे. त्यानंतर विजेता टोकियो येथे होणाऱ्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading