पँटोमॅथ ग्रुपच्या द वेल्थ कंपनीतर्फे अॅम्नेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज मध्ये 460 कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई : द वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या पँटोमॅथ ग्रुप कंपनीने आज त्यांच्या भारत व्हॅल्यू फंड (BVF) द्वारे अहमदाबादस्थित अॅम्नेक्स इन्फो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (“कंपनी”) मध्ये 460 कोटी रुपये (अंदाजे 52 दशलक्ष अमेरिकन डॉलर) गुंतवणुकीची घोषणा केली. त्यायोगे अॅम्नेक्सच्या पहिल्या ग्रोथ कॅपिटल निधी फेरीची यशस्वी सांगता झाली आहे.
२००८ मध्ये टेक्नोक्रॅट्स आदित्य शाह आणि तपन गोसालिया यांनी स्थापन केलेले अॅम्नेक्स मोठ्या प्रमाणात क्लायंटसाठी डिझाइन आणि विकासापासून ते इंटिग्रेशन-लीव्हरेजिंग हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा अॅनालिटिक्स आणि इंडस्ट्री 4.0 टूल्स (IoT, GIS, AI/ML आणि ब्लॉकचेन) पर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान उपायसुविधा सादर करते. कंपनीने वाहतूक, दळणवळण, युटिलिटीज, खाणकाम, लॉजिस्टिक्स, स्मार्ट सिटीज आणि शेती यासह अनेक उद्योगांना सेवा देण्यासाठी १८ हून अधिक मालकीचे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. पारदर्शकता, सुलभता आणि मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढविण्यासाठी या उपाय सुविधा डिझाइन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) डिलिव्हरी, प्रगत विश्लेषण आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन साठी सुसंगत ओपन प्लॅटफॉर्मसह एकत्रित आहे.
गेल्या तीन वर्षांत, अॅम्नेक्सने 75% CAGR मिळवला आहे. शिस्तबद्ध स्केलिंगसह अॅसेट-लाइट मॉडेलवर कार्यरत राहून कंपनीने सातत्याने 40% पेक्षा जास्त ROCE सादर केले आहेत. मजबूत ऑर्डर बुक आणि बाजारपेठेत खोलवर स्थान यांसह अॅम्नेक्स भारतातील या क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.
गुंतवणुकीबद्दल बोलताना वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुश्री मधु लुणावत म्हणाल्या, “डिजिटल इंडिया, इंडिया स्टॅक आणि नॅशनल एआय मिशन सारख्या परिवर्तनकारी राष्ट्रीय उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा गुंतवणूक 1.19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आणि सुमारे 10% CAGR पर्यंत पोहोचली. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब वेगाने होत असताना, प्लॅटफॉर्म प्रणीत परिवर्तने, इंटेलिजन्स प्रणीत सेवा वितरण आणि सार्वत्रिक उपलब्धता यामुळे शक्तिशाली आर्थिक प्रवाह आकार घेत आहेत. या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात, अॅम्नेक्स सिद्धहस्त ट्रॅक रेकॉर्ड, सखोल डोमेन मास्टरी आणि विस्तारक्षम तंत्रज्ञान क्षमतांसह महत्त्वपूर्ण मूल्ये खुली करण्यास आणि भारताच्या डिजिटल विकासगाथेचा पुढील अध्याय घडवण्यास सज्ज आहे.”
अॅम्नेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आदित्य शाह अॅम्नेक्सच्या विकास योजनांबद्दल बोलताना म्हणाले, “आम्ही एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, संदर्भित डेटा आणि कनेक्टेड पायाभूत सुविधा ही केवळ साधने नाहीत तर लोक कसे जगतात, कसे कनेक्ट होतात आणि कशी त्यांची प्रगती होते याचे फॅब्रिक बनत आहेत. अॅम्नेक्समध्ये, आमचे ध्येय मानवी गरजा ओळखणाऱ्या, अडथळे दूर करणाऱ्या आणि डिजिटल पायाभूत सुविधांची खरी क्षमता खुली करणारी व्यवस्था डिझाइन करणे आहे. विकास भांडवल, सखोल कौशल्य आणि मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचे धाडस यासह आम्ही उद्याच्या समाजांच्या कार्यप्रणालीला अधिक समावेशक, अधिक लवचिक आणि मानवी गरजांशी खोलवर सुसंगत बनवण्यास तयार आहोत.”
अॅम्नेक्सच्या उपायसुविधा वाहतूक, वाहतूक व्यवस्थापन, युटीलिटी, खाणकाम, लॉजिस्टिक्स, शहरी पायाभूत सुविधा आणि शेती यासारख्या क्षेत्रांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि मोठ्या प्रमाणात प्रभाव सादर करतात. भारतातील काही मोजक्या कंपन्यांपैकी ही एक असून ती सर्व प्रमुख विभागांमध्ये व्यापक आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ सादर करते. मिशन-क्रिटिकल डोमेनमध्ये जटिल, उच्च-प्रभाव प्रकल्प राबविण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
बीव्हीएफ भारताच्या विकासगथेत सक्रियपणे गुंतवणूक करत आहे. गेल्या सहा महिन्यांत, फंडाने अर्धा डझन गुंतवणूक पूर्ण केली असून भांडवल उभारणी, डीप्लायमेंट आणि एक्झिट यामध्ये सर्वात वेगवान असणाऱ्यापैकी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये अलीकडील काळात काही भर पडली असून त्यामध्ये हलदीराम भुजियावाला लिमिटेड, प्रीझमा ग्लोबल लिमिटेड हे समाविष्ट आहे.
