Monday, May 25, 2026
BusinessLatest News

आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीचा अहवाल केआयएलकडून जाहीर

  • वार्षिक 44% ची वाढ नोंदवत निव्वळ एकत्रित नफा INR 95 कोटी

पुणे : किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने (KIL) (BSE: 500243; NSE: KIRLOSIND), आज आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.

आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करतानाकेआयएलचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज वर्गीस म्हणाले, “उपकंपनीची मजबूत कामगिरी तसेच काही ऑपरेशन्स बंद केल्याने कंपनीची कामगिरी मजबूत झाली आहे. वार्षिक 25% वाढ नोंदवत केआयएलने 7.9 कोटी रुपयांचा स्वतंत्र PAT कमावला तर एकत्रित पीएटीमध्ये 44% वाढ नोंदवली आहे. आमच्या उपकंपन्यांमधील केएफआयएलने धोरणात्मक सहकार्य आणि कच्च्या मालाच्या सुरक्षिततेद्वारे चांगली वाढ नोंदवली आहे, तर अवंते स्पेसेसने कोथरुडमधील त्यांच्या ~1.6 दशलक्ष चौरस फूट आयजीबीसी आणि लीड प्लॅटिनम प्री-प्रमाणित प्रकल्पात ठरल्याप्रमाणे प्रगती केली. शाश्वत वाढ आणि दीर्घकालीन मूल्य निर्मितीवरील आमचे लक्ष हे अधोरेखित करते.”

आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र)*:

  • आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न 14.9 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 25 च्या तिमाहीतील एकूण उत्पन्न 15.8 कोटी रुपये; उत्पन्नात वार्षिक 6% घट
  • आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत PAT 7.8 कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत PAT 6.5 कोटी रुपये होता; वार्षिक 21% वाढ

आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित)*:

  • आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न 1,716.4 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न 1,571.5 कोटी रुपये; वार्षिक 9% वाढ
  • आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील PAT 95.4 कोटी रुपये, आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत PAT 66.3 कोटी रुपये; वार्षिक 44% वाढ

* सर्व आकडे केवळ सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन्सचा संदर्भ देतात. इतर व्यापक उत्पन्नाच्या आधी PAT येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading