Monday, May 25, 2026
BusinessLatest News

वारमोरा ग्रॅनिटो लिमिटेडने सेबीकडे डीआरएचप केला सादर

भारत : राजकोट मुख्यालय असलेल्या वारमोरा ग्रॅनिटो लिमिटेड (VGL) ने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावासाठी (IPO) सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे ड्राफ्ट रेड हर्निंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर केला आहे. या ऑफरमध्ये रु 400 कोटींपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि 5,24,35,268 इक्विटी शेअर्सपर्यंतचा ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. OFS मध्ये गुंतवणूकदार विक्रीकरता असलेली कस्तुरा इन्व्हेस्टमेंट्स आणि प्रमोटर ग्रुपच्या विक्रीकरता असलेल्या शेअरहोल्डर्स म्हणजे पारसोतंबहाई जीवराजभाई पटेल, रमणभाई जीवराजभाई वारमोरा आणि वल्लभभाई जीवराजभाई वारमोरा यांचा समावेश आहे.

व्हीजीएल ही निवडलेल्या सूचीबद्ध स्पर्धकांपैकी वित्त वर्ष 2025 मध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने भारतातील टाइल्स बाजारातील आघाडीची कंपन्यांपैकी एक आहे (स्रोत: Technopak रिपोर्ट). टेक्नोपाक रिपोर्टनुसार, वित्त वर्ष 2023 ते 2025 दरम्यान उत्पन्नाच्या CAGRच्या दृष्टीने व्हीजीएल ही भारतातील निवडलेल्या सूचीबद्ध स्पर्धकांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे, ज्यामध्ये टाइल्स हा कंपनीचा मुख्य विभाग आहे.

टेक्नोपाक रिपोर्टनुसार, कंपनीने 2010 मध्ये डिजिटल प्रिंटेड वॉल टाइल्स प्रथम लाँच केल्या आणि 2006 मध्ये उद्योगात पहिल्यांपैकी एक म्हणून होमोजिनस-बॉडी स्लॅब्स ((i) 1170 x 1770 मिमी; आणि (ii) 1185 x 1785 मिमी फुल-बॉडी स्लॅब्स) सादर केले. तसेच, 2012 मध्ये डबल चार्ज टाइल्स, 2017 मध्ये हाय ग्लॉस आणि रॉकर, आणि 2020 मध्ये किचन स्लॅब्स (80×260) लाँच केले. कंपनी 2024 मध्ये आशियात इंटीग्रेटेड स्टोन टेक्नॉलॉजी (“IST”) व्यावसायिकरित्या प्रथम प्रस्थापित करणारी देखील आहे (स्रोत: टेक्नोपाक रिपोर्ट), ज्यासाठी SACMI Imola S.C. (“SACMI”), या इटालियन टाइल उपकरण पुरवठादार कंपनीशी तंत्रज्ञान भागीदारी आहे.

व्हीजीएलच्या उत्पादनांमध्ये उच्च प्रतीचे, टिकाऊ आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक टाइल्सची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. कंपनीचा मुख्य भर प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीवर आहे, जसे की GVT, जे वित्त वर्ष 2025, 2024 आणि 2023 मध्ये टाइल्समधील ऑपरेशन्सच्या उत्पन्नाचा अनुक्रमे 78.71%, 75.37% आणि 69.35% भाग होता. व्हीजीएलकडे गुजरातमधील मोरबी क्लस्टरमध्ये नऊ रणनीतिकरित्या स्थित उत्पादन सुविधा आहेत.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत आणि ट्रायलिगल हे कायदेशीर सल्लागार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading