Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रा. नंदकुमार सागर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

 

 

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी, सातारा यांना निवेदन सादर केले.

यावेळी ,संजय यादव, , आर. वाय. जाधव, कल्याण शिंदे, सुधाकर जगदाळे, हनुमंत पवार,भरत मोजर,सतीश पिसाळ,तानाजी मिसाळ, राजश्री पवार,विलास गगनमाले,हे उपस्थित होते.सातारा जिल्ह्यातील वाई, कराड, पाटण, जावली, फलटण, कोरेगाव व महाबळेश्वर तालुक्यातील ३० हून अधिक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

१. जिल्ह्यातील अंशतः व विनाअनुदानित शाळांना तात्काळ १००% अनुदान लागू करावे.
२. २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी.
३. शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय देयके, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता व शालार्थ आयडीच्या तांत्रिक अडचणी त्वरित सोडवाव्यात.
4 RTA 2009कायद्याच्या अगोदर सेवेत असलेल्या शिक्षकांना TET लागू करू नये. 5 संच मान्यतेचे अन्याय कारक निर्णय बदलावेत 6.पोर्टल द्वारे तत्वरित 100 % पदांची मान्यता दयावी. 7)1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे 26900शिक्षक -शिक्षककेतर कर्मचाऱ्यांना विना अट पेन्शन देणे गरजेचे.
यावेळी बोलताना प्रा. नंदकुमार सागर म्हणाले, “सातारा जिल्हा हा शिक्षकांचा जिल्हा आहे. येथील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत आलो आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी हा लढा असाच सुरू राहील.”

जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading