Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

ब्रशद्वारे मुलांनी दिला देशभक्तीबरोबरच आरोग्‍याचा संदेश

पुणे :  आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल (ABMH) च्या ‘मदर अँड चाइल्ड केअर’ विभागातर्फे ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ ही चित्रे काढणे व रंगवण्याची लोकप्रिय चित्रकला स्पर्धा हॉस्पिटलमध्‍ये रविवारी १० ऑगस्ट रोजी मोठया जल्लोषात पार पडली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेची थीम ‘इंडिया@७८ : सेलिब्रेटिंग फ्रीडम थ्रू हेल्थ’ (आरोग्‍याच्‍या माध्‍यमातून ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना भारत) ही होती. यामध्‍ये ३ ते १५ वयोगटातील हजारांहून अधिक बालकांनी पालकांसह सहभाग नोंदवला व देशभक्तीबरोबरच आरोग्याचा संदेश आपल्या ब्रशद्वारे तयार केलेल्‍या कलाकृतीतून दिला. स्पर्धेचे निकाल २३ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केले जाणार आहेत.

ही स्पर्धा तीन वयोगटात घेण्यात आली व वयोगटानुसार त्‍यांना चित्र काढण्‍यासाठी वेगवेगळे विषय देण्‍यात आले. यातील ३-४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘हेल्दी मी, हॅप्‍पी इंडिया’(माझे आरोग्य,आनंदी भारत ), ५-९ वर्षे वयोगटासाठी ‘माय ड्रीम हॉस्पिटल फॉर अ हेल्दी इंडिया’ (निरोगी भारतासाठी माझे स्‍वप्‍नातील हॉस्पिटल) आणि १०-१५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘आयुष्मान भारत : माय व्हीजन फॉर अ हेल्दी, इंडिपेंडंट इंडिया’ (आयुष्‍मान भारत योजना ः स्‍वतंत्र व निरोगी भारतासाठी एक दृष्टिकोन) असे होते. ‘पेंट, क्रिएट, सेलिब्रेट’ या व्यापक विषयांतर्गत मुलांना कल्पनाशक्ती, रंग, कथा आणि स्वःअभिव्यक्तीचा आविष्कार मांडण्याची संधी येथे मिळाली.

मुलांसाठी चित्रकलेच्‍या स्‍पर्धेबरोबरच त्‍यांच्‍या पालकांसाठी मुलांच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्‍यांना लसीकरणाचे महत्त्व, मेंदूच्या विकासात पोषणाची भूमिका, सकारात्मक पालकत्वाद्वारे मानसिक सशक्‍तीकरण, प्रौढ लसीकरण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांवर त्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाविषयी बोलताना डॉ. प्रिया मानकरे , असोसिएट डायरेक्टर (सहयोगी संचालक) आणि वरिष्ठ बालरोग सल्लागार, म्हणाल्या, “स्प्लॅश ऑफ कलर्स ही केवळ चित्रकला स्पर्धा नसून आनंद, कल्पकता आणि आरोग्याचा उत्सव आहे. सर्जनशील अभिव्यक्तीमुळे मुलांचे मानसिक व भावनिक आरोग्य बळकट होते. येथे त्‍यांना त्‍यांची अभिव्‍यक्‍ती व्‍यक्‍त करण्‍यास सुरक्षित वातावरण मिळते.”

आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पामेश गुप्ता यांनी या स्‍पर्धेच्‍या आयोजनाबद्दल व उत्साहाबद्दल आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “इतक्या मोठ्या संख्येने मुले एकत्र येऊन आपली कलात्मक प्रतिभा प्रदर्शित करतात व मजेदार उपक्रमांनी भरलेल्या या उपक्रमात सहभागी होणे, हे खरोखर मनाला आनंद देणारे आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे सर्जनशीलता आणि सामुदायिक भावनेचे सुंदर उत्सव आहेत. हे आपल्या समुदायाच्या आरोग्य आणि आनंदाच्या जपणुकीबाबतच्या आपल्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. विशेषत: अशा उपक्रमांद्वारे अनेक कुटुंबांना सकारात्मक, प्रेरणादायी वातावरणात एकत्र आणले जाते.”

स्पर्धेचे निकाल २३ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केले जाणार आहे. अशा कलात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करून, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल आपले आरोग्य जनजागृती आणि समुदाय सहभाग यांचा संगम साधण्याचे ध्येय जपत आहे. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देत आहे. अशा कार्यक्रमांमुळे केवळ कलात्मक कौशल्यांमध्‍ये वाढ होत नाही, तर बालआरोग्याचे अत्यावश्यक भावनिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यालाही हातभार लागत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading