Monday, May 25, 2026
BusinessLatest News

एअर इंडियाचा प्रमोशनल सेल ‘नमस्ते-वर्ल्ड’

गुरुग्राम : एअर इंडियाने ‘नमस्ते वर्ल्ड’ प्रमोशनल सेल सुरू केला आहे. या अंतर्गत एअरलाइनच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर तिकिटाचे सर्वसमावेशक आकर्षक दर उपलब्ध आहेत. या विशेष ऑफरचा भाग म्हणून, देशांतर्गत एकेरी प्रवासासाठी 1,499 रुपयांपासून तिकीट दर सुरू होतात तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दुहेरी प्रवासाचे तिकीट दर 12,310 रुपयांपासून सुरू होतात.

दरातील ही सवलत 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत लागू असेल. या सवलत मूल्यांतर्गत बूक केलेल्या तिकिटांवर 31 मार्च 2026 पर्यंत प्रवास करता येईल. इंटरनॅशनल सेल पॉईंट्सवरही ही तिकिटे बूक करता येतील. तेथे संबंधित देशाचे तिकीट दर स्थानिक चलनांमध्ये दिलेले आहे.

पहिल्या दिवशी वेब-एक्सक्लुझिव्ह

‘नमस्ते वर्ल्ड’ सेल हा 10 ऑगस्ट 2025 रोजी केवळ एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍपवर उपलब्ध असेल. त्यानंतर, या सेल अंतर्गत तिकिटांचे बुकिंग एअर इंडिया वेबसाइट, मोबाइल ऍप, विमानतळावरील तिकीट खिडक्या, ग्राहक संपर्क केंद्र आणि ट्रॅव्हल एजंट यासह अन्य सर्व चॅनेलवर उपलब्ध असेल.

थेट बुकिंगचे फायदे

एअर इंडियाची वेबसाइट आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना हा सेल सुरू असतानाच्या काळात कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागणार नाही. याव्यतिरिक्त, FLYAI हा प्रोमो कोड वापरून प्रवासी प्रति व्यक्ती INR 1,000 पर्यंत बचत करू शकतात, तसेच VISAFLY या प्रोमो कोडचा वापर करून व्हिसा कार्डद्वारे पेमेंट केल्यास प्रति प्रवासी ₹2,500 पर्यंत सूट मिळू शकते.

्हिसा कार्डवरील ऑफर्स
प्रवास सवलत प्रोमो कोड
देशांतर्गत (एकेरी) थेट INR 250 ची सवलत  

VISAFLY

देशांतर्गत (दुहेरी) INR 500 ची सवलत
आंतरराष्ट्रीय (एकेरी) INR 1,500 पर्यंत सवलत
आंतरराष्ट्रीय (दुहेरी) INR 2,500 पर्यंत सवलत


विशेष सहाय्यक ऑफर्ससह प्रवासाचा उत्तम अनुभव

‘नमस्ते वर्ल्ड’ सेलला पूरक म्हणून, लोकप्रिय सहाय्यक सेवांवर एअर इंडिया विशेष डील देखील देत आहे. यामुळे प्रवाशांना अनोख्या किमतीत अनेक सुविधांसह प्रवासाचा आनंद घेता येईल. एअर इंडियाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना प्रीपेड बॅगेजवर 60% पर्यंत सूट मिळेल तर पसंतीच्या आणि अतिरिक्त लेगरूमच्या सीट निवडीवर 15% पर्यंत सूट मिळू शकेल. एअर इंडियाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चॅनेलच्या माध्यमातून बुकिंगवर या ऑफर मिळतील. यामुळे सवलत मूल्यात अधिक आराम आणि सुविधा मिळतील.

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील दुहेरी प्रवासतिकीट दरांचा अंदाज
(भारतातून बाहेर प्रवासनमुनादाखल यादी)
सेक्टर  चलन इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस
भारत-यूके INR 44,500 95,000 1,43,000
भारत-युरोप INR  44,000  75,531 1,30,000
भारत-कॅनडा INR 62,199 NA 1,77,399
भारत-ऑस्ट्रेलिया INR 51,317  NA 1,63,291
भारत-यूएसए INR 49,635 1,05,666 1,90,666
भारत-श्रीलंका INR 12,310 23,130 22,050
भारत-यूएई INR 18,060 22,300 58,650
भारत-सिंगापूर INR 14,020 23,760 43,260
भारत-थायलंड INR 21,030 24,370 62,350
भारत-इंडोनेशिया INR 46,910 69,570 1,58,980
भारत-मलेशिया INR 22,180 25,720 62,640
भारत-जपान INR 38,070  NA 1,56,970

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सर्वसमावेशक दुहेरी तिकिटांच्या दराचा अंदाज
(भारतातील प्रवासनमुनादाखल यादी)
सेक्टर  चलन इकॉनॉमी प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस
यूके – भारत GBP 440 685 1,530
युरोप-भारत EUR  423 708 1,350
कॅनडा- भारत CAD 1,059 NA 2,879
ऑस्ट्रेलिया- भारत AUD 830  NA 3,898
यूएसए-भारत USD 541 1,122 2,847
यूएई-भारत AED 730 810 2,350
सिंगापूर -भारत SGD 212 358 716
थायलंड-भारत THB 7,780 8,580 26,880
इंडोनेशिया-इंडिया IDR 86,85,000 1,47,98,000 2,97,01,000
मलेशिया-भारत MYR 1,180 1,280 3,130
जपान-इंडिया JPY 70,100  2,10,800 2,81,400

या सेलमध्ये मर्यादित जागा आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्या उपलब्ध आहेत. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडक मार्गांसाठी हा सेल असेल. तसेच विनिमय दर आणि करांमुळे वेगवेगळ्या शहरांमधील तिकिटाच्या दरात किरकोळ बदल होऊ शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading