Wednesday, May 20, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

लष्करी कारवायांना हिंदुत्वाशी, धर्माशी जोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा- खासदार संजय राऊत

नवी दिल्ली: प्रतिनिधी

पठाणकोटपासून पहेलगामपर्यंत सर्व लष्करी कारवायांमध्ये राजकारण करणाऱ्या, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन महादेव, असे करीत लष्करी कारवायांना हिंदुत्वाशी, धर्माशी जोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

सभागृहात ऑपरेशन सिंदूर बद्दल चर्चा चालू असताना अनुपस्थित राहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टिकेची झोड उठवली. एवढ्या महत्त्वाच्या विषयात पंतप्रधानांनी केवळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणांचे कौतुक केले. त्याऐवजी त्यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहून या सर्वांच्या भाषणाबद्दल भाष्य करणे गरजेचे होते, असेही राऊत म्हणाले.

सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला पाकिस्तानबरोबर लढायचे नाही. त्यांना पाक व्याप्त जम्मू काश्मीर ताब्यात घ्यायचे नाही. यापूर्वी भाजपने आपले सरकार सत्तेवर आल्यास पाक व्याप्त जम्मू कश्मीर ताब्यात घेऊ असा दावा केला होता. त्याचप्रमाणे हा भारताचा भूभाग परत घेण्यासाठी आम्ही बलिदान करू, असे अमित शहा यांनी सांगितले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत सांगितले होते, योग्य मध्ये घुसून आम्ही ते ताब्यात घेऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तो ताब्यात घेणे हे आमचे कधीच उद्दिष्ट नव्हते, असे काल राजनाथ सिंग यांनी सांगितले. मग हे सरकार कशासाठी सत्तेवर बसले आहे, असा सवाल राऊत यांनी केला.

भाजपला संसदेचे महत्त्व लोकशाहीतून, संविधानातून नष्ट करायचे आहे. त्यामुळेच पंतप्रधान ऑपरेशन सिंदूरसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चेच्या वेळी अनुपस्थित राहून उलट राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री एस जय शंकर यांच्या भाषणाचे कौतुक त्यांच्या समाज माध्यमातून करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading