डीसीसीआयएच्या अध्यक्षपदी एच. पी. श्रीवास्तव
एच. पी. श्रीवास्तव यांची अध्यक्षपदी झालेली ही नियुक्ती डीसीसीआयएसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून श्रीवास्तव यांची व्यवसायांसमोरील आव्हाने आणि संधींबद्दलची सखोल समज, त्यांचे विस्तृत नेटवर्क आणि धोरणात्मक दृष्टीकोन, चेंबरला नजीकच्या भविष्यात पुढील टप्प्यावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. देश व परदेशात विविध क्षेत्रांमध्ये वरिष्ठ पदांवर तीन दशकांहून अधिक काळ कॉर्पोरेट अनुभव असलेले श्रीवास्तव हे अनेक वर्षांपासून संस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सन्मान व नम्रतापूर्वक डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे सांगत एच. पी. श्रीवास्तव म्हणाले, “नवोपक्रम व शाश्वत विकासाला चालना देण्याबरोबरच आपल्या उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सदस्य, कार्यकारी समिती आणि सर्व भागधारकांसोबत जवळून काम करण्यास मी उत्सुक आहे.” नजीकच्या भविष्यात संस्था आर्थिक प्रगतीसाठी उत्प्रेरक म्हणून आपली भूमिका आणखी वाढवण्यास सज्ज असेल, असा विश्वास यावेळी श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
