Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गुगल मॅपिंगच्या आधारे प्रभाग निश्चित करण्याचे काम सुरू

पुणे: प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकांसाठी शहरातील प्रारूप प्रभाग आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गुगल मॅपिंगच्या आधारे प्रभाग निश्चित करण्याचे काम सुरू असून चार ऑगस्ट रोजी प्रारूप आराखडा नगर विकास विभागाला सादर केला जाणार आहे. 

दीर्घकाळ लांबलेल्या महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहरातील प्रभाग निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 

पुणे महापालिकेची निवडणूक चार प्रतिनिधींच्या प्रभागानसार होणार आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महापालिका सभागृहात 165 नगरसेवकांचा सहभाग असणार आहे. त्यानुसार गुगल मॅपिंगच्या आधारे प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार केला जात आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading