Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

रियलमीच्या वतीने नवीन रियलमी १५ आणि १५ प्रो बाजारात सादर

पुणे  : कमी कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व देशात सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड अशी ओळख असलेल्या रियलमीने त्यांच्या रियलमी १५ आणि रियलमी १५ प्रो या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा आज पुण्यात केली.

नव्या पिढीतील तरुण ग्राहकांसोबतच, कंटेंट क्रिएटर्स आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी हा फोन सादर करण्यात आला असून या स्मार्टफोनचे डिझाइन हे नवीन रियलमी १५ च्या मालिकेत आपले वेगेळे स्थान निर्माण करणारे ठरेल असा विश्वास रियलमीचे भारतातील वितरण प्रमुख कपिल बेहल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ग्राहकांसाठी अविश्वसनीय किंमतीमध्ये हा स्मार्ट फोन अत्याधुनिक कॅमेरा, एआय फीचर्स आणि स्लीक डिझाइनसह नाविन्याची परिभाषा अधोरेखित करून बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण करेल असेही ते यावेळी म्हणाले.

रियलमी इंडियाचे क्यूब रिसोर्स ऑर्केस्ट्रेटर (केआरओ) प्रमुख संतोष सिंग, रियलमीचे महाराष्ट्राचे झोनल सेल्स मॅनेजर असलेले मयूर अपूर्वा, बोरा मल्टीकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बोरा, उपाध्यक्ष अमित सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रासाठी पुण्यातील बोरा मल्टीकॉर्पची सुपर एजंट म्हणून नियुक्ती देखील यावेळी जाहीर करण्यात आली.

रियलमी कडून सादर करण्यात आलेले स्मार्टफोनचे हे अत्याधुनिक मॉडेल एआय-चालित पार्टी फोटोग्राफीच्या एका नव्या युगाला सुरूवात करेल, असे सांगत प्रशांत बोरा म्हणाले, “लिव्ह रियल इन एव्हरी शॉट… ही आमची टॅगलाईन असून प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या मदतीने कैद करीत आनंदाचे क्षण साठवून ठेवण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी हा पार्टी फोन एक सर्वोत्तम पर्याय आहे. ५०+५०+५० एमपी ट्रिपल कॅमेरा सिस्टमसह या फोनमध्ये ग्राहकांना आपल्या आठवणी कैद करता येतील शिवाय कॅमेऱ्याच्या मदतीने ४ के ६० एफपीएस दर्जाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही फोनमध्ये सहजरित्या करता येईल. या अत्याधुनिक फिचर्समुळे ग्राहकांना अत्युच्च दर्जाच्या फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षमतेचा अनुभव घेता येणार आहे.”

४के ६० एफपीएस सपोर्ट असलेला ५०एमपी+ ५० एमपी+ ५० एमपी चा एआय कॅमेरा, जनरेशन ४- स्नॅपड्रॅगन ७ असलेला नवीन चिप सेट, पोर्टेबिलिटीला प्राधान्य देत सर्वात स्लिम ७००० mAh ची बॅटरी, ६५०० निट्स कर्व्ह असलेला AMOLED चा डिस्प्ले, ग्राहकांसाठी पूर्णपणे नवीन AI एडिट स्मार्ट जिनी आणि ७.६९ मिमी अल्ट्रा-स्लिम व फक्त १८७ ग्रॅम वजन ही नव्याने सादर करण्यात आलेल्या रिअलमी १५ प्रो ची काही ठळक वैशिष्ट्ये असून यामुळे ‘प्रो’ मालिकेला आम्ही पुनर्परिभाषा करीत आहोत असे यावेळी रियलमीच्या प्रतिनिधींनी कळविले.

रिअलमी १५ बद्दल अधिक माहिती देताना अमित सिंग म्हणाले की, “या मॉडेलमध्ये दररोजच्या मल्टीटास्किंगसाठी सर्वच आवश्यक गोष्टी पुरविण्यात आल्या आहेत. याबरोबरच वजनाने हलका व वापण्यास सोयीचा असलेला डिस्प्ले, मनोरंजनात्मक बाबींसाठी लागणारी पुरेशी बॅटरी आणि दिसण्यास आकर्षक असा हा स्मार्ट फोन आधुनिक जीवनशैलीसाठी अनुकूल आहे.”

“रियलमी प्रोच्या आधीच्या स्मार्टफोनशी तुलना केल्यास हा स्मार्टफोन प्रत्येक विभागाचे सुधारित व्हर्जन असून प्रोसेसिंगची गती, बॅटरी क्षमता, एआय तंत्रज्ञानातील सुधारणा, गुणवत्तापूर्ण डिस्प्ले आणि एक अतुलनीय कॅमेऱ्याचा अनुभव याद्वारे ग्राहकांसमोर हा स्मार्ट सादर करताना आम्हाला आनंद होत असून रिअलमीच्या प्रो मालिकेतील आतापर्यंतचे हे सर्वात धाडसी पाऊल असल्याची कबुली यावेळी मयूर अपूर्वा यांनी दिली. मागील प्रो मालिकेपेक्षा हा स्मार्ट फोन अधिक अपग्रेड आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

रिअलमी १५ मालिका लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून आश्चर्यचकित किंमतीमध्ये देशभरातील चाहत्यांसाठी तो उपलब्ध असेल. याबरोबरच लाँच डे आणि प्री-ऑर्डर ऑफर्सदेखील रियलमी कडून देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असून पुणेस्थित बोरा मल्टीकॉर्पला मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी सुपर एजंट म्हणून नियुक्ती मिळत असताना करताना आम्हाला आनंद होत असल्याचे बोरा यावेळी म्हणाले.

एक अनुभवी व्यापारी व बोरा मल्टीकॉर्पचे दूरदर्शी नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत बोरा यावेळी म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे असे आम्ही मानतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात रियलमी पोहोचविणे हे नजीकच्या भविष्यातील आमचे ध्येय असेल. डिजिटल असण्यासाठी स्मार्टफोनची उपलब्धता ही मूलभूत गरज असून ही स्मार्टफोन कंपन्यांसाठी एक प्रचंड मोठी संधी आहे, असे मला वाटते. रिअलमीसोबत होत असलेल्या या भागीदारीद्वारे प्रत्येक घरापर्यंत स्मार्टफोन नेत डिजिटल दरी भरून काढण्यासाठी व समाजाला डिजिटली सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading