Wednesday, May 27, 2026
BusinessLatest News

अदानी एंटरप्रायझेसतर्फे वार्षिक 9.30% पर्यंत ऑफर देत 1,000 कोटी रु. च्या NCD इश्यूची घोषणा

 

 

अहमदाबाद : अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी आणि मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी लिस्टेड बिझनेस इन्क्युबेटर अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (“कंपनी” किंवा “AEL”) ला 1993 पासून शाश्वत पायाभूत सुविधा व्यवसाय निर्मितीचा दीर्घ अनुभव असून कंपनीने सुरक्षित, रेट केलेल्या, लिस्टेड रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या आपल्या दुसऱ्या पब्लिक इश्यूची घोषणा केली आहे. AEL चा पहिला 800 कोटी रु. चा NCD इश्यू गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आला होता आणि पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता.

“AEL कडून होणारा दुसरा सार्वजनिक NCD इश्यू सर्वसमावेशक भांडवली बाजारपेठेच्या वाढीसाठी आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा विकासामध्ये रिटेल गुंतवणुकीच्या सहभागासाठी आमच्या बांधिलकीला अधिक बळकट करत आहे. AEL च्या पहिल्या NCD इश्यूला मिळालेल्या मजबूत प्रतिसादानंतर हा नवीन इश्यू सादर होत आहे. त्या इश्यूला रेटिंगमध्ये सहा महिन्यांत सुधारणा मिळाली आणि डेब्ट गुंतवणूकदारांना भांडवली मूल्यवृद्धीचा लाभ मिळाला. हे सर्व समूहाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि आर्थिक बळकटीचे प्रतीक आहे,” असे अदानी ग्रुपचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर ‘रॉबी’ सिंग म्हणाले. “अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी यासारख्या भारतातील अत्यावश्यक महत्वाच्या ऊर्जा आणि वाहतूक सेवा प्लॅटफॉर्मचे इन्क्युबेटर म्हणून, AEL आता विमानतळ, रस्ते, डेटा सेंटर्स आणि हरित हायड्रोजन परिसंस्था यामधील अत्याधुनिक पायाभूत सुविधा व्यवसायांचे यशस्वी स्केलिंग करत आहे. भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासात या प्रत्येक क्षेत्राची परिवर्तनकारी भूमिका राहणार आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

NBFCs व्यतिरिक्त, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी लिस्टेड डेब्ट उत्पादन देणारी AEL ही एकमेव कॉर्पोरेट कंपनी आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारताच्या पायाभूत सुविधा विकास गाथेमध्ये भाग घेण्याची दुर्मीळ संधी मिळत आहे. अलीकडील दर कपात आणि सौम्य व्याजदर चक्राच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर, AEL NCD इश्यू स्थिर, निश्चित उत्पन्न पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य संधी ठरत आहे. समान रेट केलेल्या NCDs आणि फिक्स्ड डिपॉझिट्सच्या तुलनेत चांगला कार्यक्षम  परतावा देणारा हा सार्वजनिक इश्यू गुंतवणूकदारांसाठी एक मूल्यवान संधी सादर करतो.

प्रस्तावित NCDs ला “Care AA-; Stable” आणि “[ICRA]AA- (Stable)” अशी रेटिंग देण्यात आली आहे. CARE Ratings ने प्रथम अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ची क्रेडिट रेटिंग 19 फेब्रुवारी 2025 रोजी अपग्रेड केली आणि 18 जून 2025 रोजी ती पुन्हा कायम ठेवली. ICRA ने 28 मार्च 2025 रोजी “[ICRA]AA- (Stable)” रेटिंग दिले आणि 17 जून 2025 रोजी ते पुन्हा कायम केले. या रेटिंगसह सिक्युरिटीजना आर्थिक जबाबदारी वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने उच्च सुरक्षेचे मानले जाते. अशा सिक्युरिटीजमधील क्रेडिट जोखीम अत्यंत कमी असते.

या इश्यूचा बेस साईज 500 कोटी रु. असून 500 कोटी रु. च्या अतिरिक्त सदस्यतेसाठी रक्कम ठेवण्याचा पर्याय आहे (“Green Shoe Option”). त्यासाठी एकूण रक्कम 1,000 कोटी रु. पर्यंत (“इश्यू” किंवा “इश्यू साईज”) आहे. हा इश्यू 9 जुलै 2025 रोजी सुरू होईल आणि 22 जुलै 2025 रोजी बंद होत असून तो लवकर बंद करण्याचा किंवा मुदतवाढीचा पर्याय उपलब्ध आहे.

या NCDs चे दर्शनी मूल्य प्रत्येकी 1000 रु. इतके आहे. प्रत्येक अर्ज किमान 10 NCDs साठी करता येणार असून त्यानंतर प्रत्येक 1 NCD च्या पटीत अर्ज करता येईल. किमान अर्ज रक्कम 10,000 रु.  इतकी आहे.

या इश्यूमधून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी किमान 75% रक्कम कंपनीने घेतलेल्या विद्यमान कर्जाच्या पूर्ण किंवा अंशतः पूर्वफेड किंवा परतफेड यासाठी वापरण्यात येईल आणि उर्वरित (कमाल 25%) सर्वसाधारण कॉर्पोरेट वापरासाठी वापरण्यात येईल.

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टिपसन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे लीड मॅनेजर्स आहेत.

हे NCDs 24 महिने, 36 महिने आणि 60 महिने अशा मुदतींसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्रैमासिक, वार्षिक आणि एकत्रित व्याज भरण्याचे पर्याय आठ वेगवेगळ्या सिरिजमधून दिले जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading