Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबी कडे डीआरएचपी सादर

डीआरएचपी लिंक:

https://www.bseindia.com/corporates/download/346914/IPO%20Prior/DRHP_20250630170831.pdf

अमेरिकेत मुख्यालय असलेल्या टेनेको समूहाचा एक भाग असलेली टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेड ही कंपनी एक प्रमुख जागतिक टियर 1 ऑटोमोटिव्ह घटक पुरवठादार असून (स्त्रोत: क्रीसील अहवाल) कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबीकडे प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सादर केला आहे.

टेनेको मॉरिशस होल्डिंग्स लिमिटेड, टेनेको (मॉरिशस) लिमिटेड, फेडरल-मोगुल इन्व्हेस्टमेंट्स बी.व्ही., फेडरल-मोगुल पीटीवाय लिमिटेड आणि टेनेको एलएलसी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

या ऑफरमध्ये टेनेको मॉरिशस होल्डिंग्स लिमिटेड (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) कडून 3000 कोटी रु. पर्यंतच्या एकूण ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 रु. आहे.

टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेड ही टेनेको समूहाचा एक भाग आहे. अमेरिकेत मुख्यालय असलेली ही एक प्रमुख जागतिक टियर I ऑटोमोटिव्ह घटक पुरवठादार आहे. टेनेको समूहाने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षात 16,777 दशलक्ष अमेरिकन डॉलर उत्पन्न मिळवले. कंपनीने भारतात आपला पहिला उत्पादन प्रकल्प 1979 मध्ये परवाणू येथे स्थापन केला. ही कंपनी भारतीय OEMs व निर्यात बाजारपेठांसाठी महत्वपूर्ण, अत्यावश्यक, अत्याधुनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान-आधारित क्लीन एअर, पॉवरट्रेन आणि सस्पेन्शन सोल्यूशन्स तयार करते आणि त्यांचा पुरवठा करते.

या कंपनीची उत्पादने वापरणारे OEMs प्रकारांमधील ग्राहक पुढील प्रमाणे आहेत: (i) प्रवासी वाहने (“PVs”), (ii) व्यावसायिक वाहने (“CVs”). यामध्ये व्यावसायिक ट्रक्स (“CTs”) आणि ऑफ हायवे व्हेईकल्स (“OHs”) यांचा समावेश होतो आणि (iii) औद्योगिक आणि इतर उपयोग. यामध्ये जनरेटर सेट्स, 3.5 टनांपेक्षा कमी वजन असलेली लहान व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि तीनचाकी (“औद्योगिक/इतर”) यांचा समावेश होतो. ही कंपनी विक्री पश्चात बाजारपेठे मध्ये देखील मोटोकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“Motocare”) मार्फत विक्री करते. ही टेनेको LLC व त्याच्या समूह कंपनीची उपकंपनी आहे.

टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेड ही प्रत्येक उत्पादन योजना क्षेत्रात मजबूत स्थितीत आहे:

  • ही कंपनी भारतीय CT OEMs साठी क्लीन एअर सोल्यूशन्सची सर्वात मोठी पुरवठादार असून तिचा बाजारपेठीय हिस्सा 60% आहे.
  • ही कंपनी भारतीय OH OEMs (ट्रॅक्टर्स वगळून) साठी क्लीन एअर सोल्यूशन्स च्या दोन प्रमुख पुरवठादारांपैकी एक असून तिचा हिस्सा 42% आहे.
  • ही कंपनी भारतीय PV OEMs साठी क्लीन एअर सोल्यूशन्स च्या चार प्रमुख पुरवठादारांपैकी एक असून तिचा बाजारपेठीय हिस्सा 20% आहे.
  • ही कंपनी भारतीय PV OEMs साठी शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आणि struts ची सर्वात मोठी पुरवठादार असून तिचा बाजारपेठीय हिस्सा 48% आहे.

(वरील सर्व मूल्य (उत्पन्न) आधारावर आर्थिक वर्ष 2024 साठी आहेत) (स्त्रोत: क्रीसील अहवाल)

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मार्फत सादर केलेले इक्विटी शेअर्स हे बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई” आणि मिळून “स्टॉक एक्स्चेंजेस”) वर सूचीबद्ध होणार आहेत.

जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि एचएसबीसी सिक्युरिटीज अ‍ॅन्ड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading