अचूक स्वदेशी अभियांत्रिकी उपायांद्वारे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप भारताच्या ईव्ही वाढीला भक्कम पाठबळ देतो
मुंबई : भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्राचा जोमाने विस्तार होत असतानाच, प्रगत टूलिंग सोल्यूशन्सद्वारे उद्योगाच्या पुरवठा साखळीला बळकटी देण्यात गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा टूलिंग व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहने घेण्याकडे वाढता कल आहे. त्यामुळेच नवीन इंजिन, बॅटरी बॉक्स आणि उत्तम दर्जाच्या शीट मेटल पार्ट्सचा विकास गरजेचा आहे. हेच लक्षात घेऊन EV उत्पादनाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या हाय प्रिसिजन डाय आणि महत्त्वाच्या EV घटकांसाठी टूलिंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करून व्यवसायाने आपली क्षमता वाढवली आहे. EV मागणीत वाढ होण्याचा अंदाज बांधून, कंपनीने भविष्यासाठी तयार नवोपक्रमांना चालना देण्यासाठी, विकसनशील उद्योगांच्या गरज पूर्ण करण्यासाठी तसेच उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यासाठी संशोधन – विकास आणि प्रगत यंत्रसामग्रीमध्ये धोरणात्मकरित्या आपल्या महसुलाच्या 2–3% गुंतवणूक केली आहे.
मे 2025 मध्ये ईव्ही विक्रीत वार्षिक 28% वाढ झाली आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये विक्रमी 1.96 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली, स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात आलेले, आणि उत्तम दर्जाच्या ईव्ही घटकांची मागणी कधीही एवढी वाढली नव्हती. ईव्ही इको सिस्टीमसाठी तयार केलेल्या उत्तम दर्जाच्या डाय आणि टूलिंग सिस्टमकडे व्यवसायाने प्राधान्याने लक्ष दिले आहे. या केंद्रित दृष्टिकोनामुळे भारतातील टियर 1 आणि टियर 2 ऑटोमोटिव्ह पुरवठादारांना ‘मेक इन इंडिया’ आणि बाहेरील वस्तूंसाठी उत्तम स्वदेशी पर्याय निर्माण करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत राहून विकसित होत असलेल्या ईव्ही गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम केले आहे. गेल्या तीन वर्षांत व्यवसायाच्या 10-15% महसूल ईव्ही-संबंधित टूलिंग ऑर्डरमधून येतो, जे या क्षेत्राचे प्रिसिजन इंजिनीअरिंग आणि स्थानिक उत्पादनावरील वाढते अवलंबित्व दर्शवते.
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या टूलिंग व्यवसायाचे प्रमुख पंकज अभ्यंकर म्हणाले, “ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ईव्ही उत्पादक उत्पादनात सातत्याने वाढ करतच आहेत. अशावेळी वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्राची तांत्रिक गुंतागुंत आणि व्यावसायिक आवश्यकता दोन्ही समजून घेतील, अशा टूलिंग भागीदारांची त्यांना आवश्यकता आहे. भारताचे ईव्ही परिवर्तन केवळ वाहनांबद्दल नाही, तर ते एक लवचिक, स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक परिसंस्था तयार करण्याबद्दल आहे. आमच्या अचूक अभियांत्रिकी उपायांद्वारे हे परिवर्तन सक्षम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या जागतिक दर्जाच्या टूलिंग प्रणाली आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात, त्याचबरोबर लीड टाइम, खर्च कार्यक्षमता आणि उत्पादनाची विश्वासार्हता सुधारतात.”
सध्या परदेशात उत्पादित होणाऱ्या निवडक साधनांचे स्थानिकीकरण करण्याचा प्रयत्न गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप करत आहे. देशांतर्गत सुविधांमध्ये या साधनांचे उत्पादन करून, या स्थानिकीकृत उपायांसाठी दुय्यम बाजारपेठ तयार करताना निर्यातीला चालना देण्याचे व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. जागतिक सेवा आणि स्थानिक उत्पादनाची ही दुहेरी रणनीती भारताला जागतिक दर्जाच्या टूलिंग निर्यातीचे केंद्र बनवण्याची कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करते
