बजाज आलियान्झ लाईफतर्फे ULIP ग्राहकांसाठी ‘निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड’ सादर
एनएफओ कालावधी: 1 जुलै 2025 – 14 जुलै 2025
पुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज आलियान्झ लाईफने बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड या आपल्या नवीन फंड ऑफर (एनएफओ) ची घोषणा केली. कंपनीच्या ULIP उत्पादनांतर्गत सादर करण्यात आलेला हा फंड, निफ्टी 500 मल्टीफॅक्टर MQVLv 50 इंडेक्सला ट्रॅक करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना मल्टीफॅक्टर आधारित इक्विटी निर्देशांकात गुंतवणुकीची संधी आणि त्याच वेळी जीवन विमा संरक्षणदेखील देतो.
जीवन विमा संरक्षणाच्या सुरक्षिततेसह आणि संपत्ती निर्मितीच्या संधींसह पाठबळ देत बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड अंतर्भूत असलेली बजाज आलियान्झ लाईफ ULIP उत्पादने पॉलिसीधारकांना त्यांच्या जीवनातील ध्येये साध्य करण्याची क्षमता देतात.
निफ्टी 500 मल्टीफॅक्टर MQVLv 50 इंडेक्स हा नियमाधारित निर्देशांक असून तो निफ्टी 500 युनिव्हर्समधून गती किंवा वेग, गुणवत्ता, मूल्य आणि कमी अस्थिरता या चार सुस्थापित गुंतवणूक घटकांवर आधारित 50 समभाग निवडतो. हा फंड निफ्टी 500 मल्टीफॅक्टर MQVLv 50 इंडेक्सला पॅसिव्ह पद्धतीने ट्रॅक करतो आणि गुंतवणूकदारांना 50 समभागांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे मल्टीफॅक्टर धोरणामध्ये गुंतवणुकीची संधी देतो. एनएफओ 1 जुलै 2025 रोजी सुरू होईल आणि 14 जुलै 2025 रोजी बंद होईल.
भारतीय भांडवली बाजार अधिक प्रगल्भ होत असताना, अनेक गुंतवणूकदार अशा संरचित, डेटा-आधारित गुंतवणूक उपाययोजनांचा शोध घेत आहेत. ते वर्तनात्मक पूर्वग्रह कमी करत स्थिर परतावा देऊ शकतात. घटक-आधारित गुंतवणुकीचे फायदे मिळवण्यासाठी डिझाइन केलेल्या निर्देशांकाला ट्रॅक करत हा फंड अशा गरजांची पूर्तता करतो.
नवीन फंडाच्या सादरीकरणाबाबत बोलताना बजाज आलियान्झ लाईफ इनश्युरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री. श्रीनिवास राव रावुरी म्हणाले, “आमच्या ULIP उत्पादनांमध्ये हा मल्टीफॅक्टर इंडेक्स फंड सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सध्याच्या अस्थिर बाजाराच्या परिस्थितीत, घटक-आधारित पॅसिव्ह धोरण ही गुंतवणुकीत राहण्यासाठी एक स्मार्ट व शिस्तबद्ध पद्धत आहे. बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी गती किंवा वेग, गुणवत्ता, मूल्य आणि कमी अस्थिरता या चार घटकांचा समन्वय वापरतो. हा फंड गुंतवणूकदारांना सुसूत्र, नियमाधारित पद्धतीने इक्विटीमध्ये गुंतवणुकीची संधी देतो. त्यामुळे सक्रिय स्टॉक निवडीशी निगडित साचेबद्ध आणि भावनिक पूर्वग्रह दूर ठेवण्यास मदत होते. आम्हाला विश्वास आहे की दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी हे एक प्रभावी साधन ठरू शकते.”
फंडाचे गुंतवणूक धोरण पुढील चार मुख्य घटकांवर आधारित आहे:
· गती किंवा वेग: 6 महिने आणि 12 महिन्यांच्या किंमत परताव्यांवर आधारित अस्थिरतेनुसार समायोजित
· गुणवत्ता: इक्विटीवरील परतावा (ROE), आर्थिक लेव्हरेज (डेब्ट/इक्विटी रेशो) आणि मागील पाच वर्षांतील उत्पन्नातील बदल यावर आधारित
· मूल्य: अर्निंग्ज-टू-प्राईस, बुक-टू-प्राईस, सेल्स-टू-प्राईस रेशो आणि डिव्हिडंड यील्ड यांचा वापर
· कमी अस्थिरता: गेल्या वर्षाच्या तुलनेत दैनंदिन किंमत परताव्यांच्या ठरलेल्या मानक डेव्हिएशन वापरून मोजली जाते
फंड निफ्टी 500 युनिव्हर्समधून काळजीपूर्वक निवडलेल्या 50 समभागांच्या केंद्रित निर्देशांकाला ट्रॅक करत असल्यामुळे, बजाज आलियान्झ लाईफ निफ्टी 500 मल्टीफॅक्टर 50 इंडेक्स फंड अंतर्भूत बजाज आलियान्झ लाईफ ULIP उत्पादने दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी भारतीय इक्विटीजमध्ये नियोजित, घटक-आधारित गुंतवणूकीच्या शोधात असलेल्या, अत्यंत उच्च जोखीम स्वीकारू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
