सोनी इंडियातर्फे नवीन ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 आणि बार 6 साउंडबार्ससह थिएटरसारखा सिनेमाचा अनुभव घरीच घेण्याची संधी
नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज दोन नवीन इमर्सिव्ह साउंडबार्स – ब्राव्हिया थिएटर बार 6 (3.1.2ch साउंडबार वायरलेस सबवुफरसह) आणि ब्राव्हिया थिएटर सिस्टीम (5.1ch थिएटर सिस्टीम वायरलेस रियर स्पीकरसह) लाँच केली आहे. सिनेमॅटिक ऑडिओ होम देण्यासाठी खास तयार करण्यात आलेले हे साउंडबार्स दमदार सराउंड साउंड देतात, सहजपणे ब्राव्हिया टीव्हीसह इंटिग्रेट करता येतात आणि यातील इंटेलिजंट साउंड तंत्रज्ञान प्रत्येक मूव्ही नाइट, गेम्स आणि कॉन्सर्टचा अनुभव अविस्मरणीय करते.

सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर म्हणाले, ‘ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 ब्राव्हिया थिएटर बार 6 या दोन्ही उत्पादनांच्या मदतीने आम्ही भारतीय घरांत खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक अनुभवाची निर्मिती करत आहोत. ही उत्पादने सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि नाविन्य वापरून बनवण्यात आली आहेत. डॉल्बी अटमॉस आणि वायरलेस सोयीसह यातून १००० वॉट्स इमर्सिव्ह साउंडचा अनुभव मिळतो. भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर जास्त उठावदार ऑडिओ- व्हिज्युअल अनुभवाची मागणी करत असून आम्हाला खात्री आहे, की ही रेंज प्रीमियम होम इटंरटेनमेंट क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करेल.’
सोनी कॉर्पोरेशनच्या होम एंटरटेनमेंट बिझनेस युनिटच्या होम प्रॉडक्ट व्यवसायाचे जागतिक प्रमुख नेझु दैसुके म्हणाले, ‘घरच्या घरी सिनेमॅटिक अनुभूती देण्याच्या जागतिक ध्येयाच्या दिशेने आम्ही काम करत असून त्यासाठी पिक्चर क्वालिटीबरोबरच साउंड महत्त्वाचा आहे. आमची होम थिएटर उत्पादने ब्राव्हिया सारख्या नेत्रसुखद दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रँडअंतर्गत आणत आही खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक मनोरंजन यंत्रणा तयार केली आहे. भारतासारख्या बाजारपेठेत दमदार बेस आणि इमर्सिव्ह ऑडिओ यांना महत्त्व असून सिस्टीम 6 आणि बार 6 सह नवीन ब्राव्हिया थिएटर श्रेणी या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. या इंटिग्रेशनमधून आमची स्थानिक उत्पादनांना असलेले प्राधान्य दिसून येते तसेच जागतिक स्तरावर प्रीमियम होम एंटरटेनमेंट क्षेत्रातील आमचे दीर्घकालीन धोरण दिसून येते.’
सोनी कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अकॉस्टिक इंजिनियर टोमोया कातो म्हणालो, ‘ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 मागची संकल्पना स्पष्ट आहे – घरच्या घरी खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक अनुभव देणे. घरगुती मनोरंजन क्षेत्र वेगाने विकसित होत असून ते आता फक्त चांगल्या व्हिज्युअल्सपुरते मर्यादित राहिलेले नाही. ग्राहकांना इमर्सिव्ह, थिएटरसारखा साउंडही हवा आहे. व्हर्टिकल सराउंड इंजिन, एस- फोर्स प्रो फ्रंट सराउंड आणि नव्याने विकसित करण्यात आलेले स्पीकर आर्किटेक्चर यांसह ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 द्वारे समतोल, व्यापक आणि बारकाव्यांसह ध्वनीनिर्मिती केली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेऊन आम्ही त्यात सिनेमे तसेच संगीतासाठी डीप बेस आणि स्पष्ट व्होकल्स समाविष्ट केले आहेत. धमाकेदार अक्शन सीन्स असो किंवा हृदयस्पर्शी गाणं, ही सिस्टीम खऱ्या अर्थाने भारतीय ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे ध्वनीनिर्मिती करेल.’
अनुक्रमे 5.1ch आणि 3.1.2ch साउंडची ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 आणि बार 6 ची ताकद
ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 ही सर्वसमावेशक, 5.1ch 1000W वॉट्सची दमदार साउंड सिस्टीम असून त्यातील सबवूफर्स जास्त डीप, समृद्ध आणि समतोल ध्वनीची निर्मिती करतो. डॉल्बी अटमॉस आणि DTS:X सह कम्पॅटिबल असलेले दोन्ही सिस्टीम 6 आणि बार 6 सिनेमा, संगीत, गेम्सना नवी स्पष्टता देतात. सोनीच्या व्हर्टिकल सराउंड इंजिन आणि एस- फोर्स प्रो फ्रंट सराउंड तंत्रज्ञान लाभलेले दोन्ही सिस्टीम 6 आणि बार 6 व्हर्च्युअल साउंड इफेक्ट्सची निर्मिती करतात आणि तुमच्या चहूबाजूला ध्वनीची निर्मिती करतात. ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 चा सबवूफर समृद्ध आणि इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवाची निर्मिती करतो. एआय मशिन लर्निंगमुळे मानवी आवाज ओळखला जातो आणि त्यांचा आवाज वाढवला किंवा कमी केला जातो, ज्यामुळे हलक्या आवाजातले संवादही व्यवस्थित ऐकू येतात.
ब्राव्हिया थिएटर होम ऑडिओ उत्पादने प्लॅस्टिक पॅकेजिंगचे प्रमाण कमी करत आहेत. ब्राव्हिया थिएटर होम ऑडिओ उत्पादनांसाठी वापरले जाणारे फॅब्रिक्स पीईटी बॉटल्सपासून रिसायकल करण्यात आले आहे. हे साहित्य जास्त साउंड क्वालिटी. डिझाइन, टेक्स्चर व रंगासाठी काळजीपूर्वक निवडण्यात आले आहे.
उपलब्धता आणि किंमत
ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 आणि बार 6 सर्व सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स), प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स, www.ShopatSC.com आणि भारतातील इतर इ- कॉमर्स पोर्टल्सवर १ जुलै २०२५ नंतर उपलब्ध असतील.
| मॉडेल | सर्वोत्तम किंमत (रुपयमध्ये) | उपलब्धतेची तारीख |
| ब्राव्हिया थिएटर सिस्टीम 6 (5.1ch) | 49,990/- | ३ जुलै २०२५ नंतर |
| ब्राव्हिया थिएटर बार (3.1.2ch) | 39,990/- | १ जुलै २०२५ नंतर |
