Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

सिटी एफसी पुणे, साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी, फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी आणि फिनाक्यु जीओजी एफसी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे :  आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या १५ वर्षाखालील गटात सिटी एफसी पुणे, साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी, फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी आणि फिनाक्यु जीओजी एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

बावधन येथील हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या कॉशन्ट फुटबॉल पुणे आणि मावळ तालुका फुटबॉल अ‍ॅकॅडमी यांच्यामधील सामना ४-४ असा बरोबरीमध्ये सुटला. कॉशन्ट फुटबॉल पुणे संघाकडून मिहीर के. आणि कार्तिक आर. यांनी प्रत्येकी दोन गोल केले. मावळ तालुका फुटबॉल अ‍ॅकॅडमीकडून आर्यन थेऊरकर आणि सिद्धार्थ हलदर यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दुसर्‍या सामन्यामध्ये सिटी एफसी पुणे संघाने डेक्कन इलेव्हन एफसीचा ४-३ असा निसटता पराभव केला. सिटी संघाकडून प्रियांश के. याने दोन गोल तर, पार्थ जी. आणि अभियान पी. यांनी प्रत्येकी एक गोल केले. डेक्कन इलेव्हनकडून विश्व बी याने दोन गोल तर, अमेय देशपांडे याने एक गोल केला.

एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीने व्हिजन स्पोटर्स संघाचा ८-१ असा सहज पराभव केला. साई संघाकडून अथर्व डी. आणि वीर एम. यांनी प्रत्येकी ३ गोल तर, शौर्य एस. आणि हर्ष ए. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघानेसुद्धा सहज विजय नोंदविताना स्निग्मय पुणे एफसी ब संघाचा ८-० असा पराभव केला. सामन्यामध्ये फोर लायन्स्कडून नमन एम. आणि तनय टी. यांनी प्रत्येकी दोन गोल तर, आर्यमन ए., मदन पी., चित्राल जोशी आणि आरूष टी. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. फिनाक्यु जीओजी एफसी संघाने मावळ तालुका फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ५-० असा पराभव केला. अर्णव के. आणि मेहूल वाय. यांनी प्रत्येकी २ गोल आणि वेरंत पी. याने एक गोल करून फिनाक्यु एफसी संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः १५ वर्षाखालील गटः
१) कॉशन्ट फुटबॉल पुणेः ४ (मिहीर के. २ गोल, कार्तिक आर. २ गोल) बरोबरी वि. मावळ तालुका फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ४ (आर्यन थेऊरकर २ गोल, सिद्धार्थ हलदर २ गोल);
२) सिटी एफसी पुणेः ४ (पार्थ जी., अभियान पी., प्रियांश के. २ गोल) वि.वि. डेक्कन इलेव्हन एफसीः ३ (विश्व बी २ गोल, अमेय देशपांडे);
३) साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ८ (अथर्व डी. ३ गोल, वीर एम. ३ गोल, शौर्य एस., हर्ष ए.) वि.वि. व्हिजन स्पोर्टस्ः १ (साई चरण);
४) फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ८ (नमन एम. २ गोल, आर्यमन ए., मदन पी., चित्राल जोशी, आरूष टी., तनय टी. २ गोल) वि.वि. स्निग्मय पुणे एफसी बः ०;
५) फिनाक्यु जीओजी एफसीः ५ (अर्णव के. २ गोल, मेहूल वाय. २ गोल, वेरंत पी.) वि.वि. मावळ तालुका फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading