Wednesday, June 17, 2026
Latest NewsTECHNOLOGY

सिंटेल बाय अरविंदने एसनिऑस एनई सिरीजचे अनावरण केले

मुंबई : एंटरप्राइझ कम्युनिकेशन, एव्ही इंटिग्रेशन, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा उपायांमध्ये ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेली अग्रगण्य कंपनी सिंटेल बाय अरविंद यांनी आज डिजिटल पद्धतीने एसनिऑस एनई सिरीज इंटरअॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले चे यशस्वी अनावरण केले. ही सिरीज आधुनिक शाळा-कॉलेजांच्या वर्गखोल्यांपासून ते कार्यालयीन संमेलनकक्षामध्ये ऑफिस कामासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे आणि केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

पुढच्या पिढीच्या शिक्षण व वर्तमान काळातील विविध अशा वीडियो कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेयर एप्लीकेशन सहजरित्या हाताळता याव्यात याकरिता डिझाइन करण्यात आलेली ही सिरीज एक सर्वोत्तम कार्यक्षमतेचा अनुभव देते. एनई सिरीज अँड्रॉइड १४ वर चालते व त्यामध्ये ८जीबी रॅम व १२८ जीबी रोम आहे. या सीरीज मधे अद्ययावत चिपसेट आहे जो सध्याच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म मधला जलद ए७३ सीपीयूवरून बनवला आहे. ज्यामुळे सदर व्हाईटबोर्ड मॉनिटरचा रिस्पॉन्स टाइम हा खूपच जलद होतो आणि ही सिस्टम मॉनिटरला मल्टीटास्किंगसाठी सक्षम बनवते.

या सिरीजमध्ये ४के युएचडी डिस्प्ले, १७८ अंशाचा व्युइंग अँगल, अँटी-ग्लेअर आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह ‘झिरो एअर गॅप’ टफन्ड ग्लासचा समावेश आहे. ४०-पॉइंट इन्फ्रारेड टच सपोर्टमुळे अनेक वापरकर्ते एकाच वेळी सहज या मॉनिटरवर काम करू शकतात. विशेष म्हणजे, ही सिरीज कागदावर पेनने लिहित असल्याचा नैसर्गिक अनुभव देणारे लेखनही प्रदान करते—जे शिकवणी, ब्रेनस्टॉर्मिंग सेशनआणि इंटरअॅक्टिव्ह शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

“एसनिऑस एनई सिरीजच्या लाँचसह, आपण केवळ एक उत्पादन सादर करत नाही, तर शिक्षक आणि व्यावसायिकांसाठी अधिक स्मार्ट आणि तंत्रज्ञानाने जुळलेले भविष्य घडवत आहोत,” असे मत परेश शेट्टी, सीईओ – आर्य ओम्निटॉक आणि सिंटेल बाय अरविंद यांनी व्यक्त केले. “आमचे हे उत्पादन आमच्या नवकल्पना,आणि  उपभोगता प्रणित प्रत्येक शिक्षण व कामाच्या ठिकाणी सहज सहकार्य वाढवण्याच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे.”

स्मार्ट कनेक्टिव्हिटीसाठी डिझाइन केलेली ही सिरीज विविध उपकरणे आणि प्लॅटफॉर्म्ससोबत सुसंगत आहे, जे तिला कोणत्याही वातावरणात उपयुक्त ठरवते. यामधील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे एसनिऑस सिन्टेलेक्ट —हे एआय-आधारित जीपीटी तंत्रज्ञानावर चालणारे व्हाईटबोर्ड टूल आहे, जे हस्ताक्षर ओळखते आणि बुद्धिमान सूचना व सहज कन्टेन्ट शेअरिंगसह सहकार्य वाढवते. ही क्रांतिकारी नवकल्पना इंटरअॅक्टिव्ह डिस्प्लेमध्ये नव्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading