पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमीला विजेतेपद !!
या आव्हानाला उत्तर देताना वैभव क्रिकेट अॅकॅडमीचा डाव २५ षटकामध्ये १४२ धावांवर मर्यादित राहीला. वीरन पाटील याने ४५ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. याशिवाय आर्यन ताकवणे याने ३१ धावांचे योगदान दिले. स्वराज मोरे याने १७ धावांमध्ये ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली आणि संघाच्या विजयामध्ये अष्टपैलु योगदान दिले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सर्वोच्च परिषदेचे सदस्य सुशील शेवाळे, माजी रणजीपटू प्रभाकर मोरे, पराग मोरे, चेतन थोरात, निशा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक मोहसीन तांबोळी, समीर पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या पृथ्वी अॅकॅडमी आणि उपविजेत्या वैभव अॅकॅडमीला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ४ गडी बाद १७८ धावा (शौर्य कोंडे ४१, सर्वेश आर. ३९, स्वराज मोरे ३३, पृथ्वीराज खांडवे ३१, तनिष्क दरेकर २-१८, ओम कुटळे २-२१) वि.वि. वैभव क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १४२ धावा (वीरन पाटील ५४ (४५, ९ चौकार, १ षटकार), आर्यन ताकवणे ३१, स्वराज मोरे ३-१७, अमन माने २-२२); सामनावीरः स्वराज मोरे.
