Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

जाधवर विज्ञान महोत्सवात रमले बाल व युवा विज्ञानप्रेमी

पुणे : बॅटरी फ्रॉम वेस्ट, बायो फ्युएल फ्रॉम अ‍ॅग्रीकल्चर वेस्ट, स्मार्ट एआय बेस रोबोट, बायो मेडिकल वेस्ट प्युरिफिकेशन अशा प्रकल्पांसह स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी इन व्हेईकल इंडस्ट्री या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित ५०० हून अधिक प्रकल्प बाल व युवा विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी सादर केले. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत ‘सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल १ येथे करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी झील कॉलेज आॅफ इंजिनिअरींगचे मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख डॉ. अमोल उबाळे, प्रभुदेसाई क्लासेसचे संचालक प्रतिक भडसावळे, विज्ञान शिक्षक बाळसाहेब ढोरमारे, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात झाली. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम आहे. भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading