Monday, September 21, 2026
Latest NewsPUNE

स्वारगेट आगारातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकीची नाळ!

 

पुणे : दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी मार्ग क्रमांक ५/२ वरील बसमध्ये कर्तव्य बजावत असताना वाहक CR 5419 श्री. संदीप लहाने व चालक DR 5301 श्री. चव्हाण यांना प्रवाशाची बॅग आढळून आली.

या बॅगेमध्ये तब्बल रु. १.५० लाख किमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू होत्या. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवत बॅग सुरक्षित ठेवली आणि योग्य खातरजमा केल्यानंतर ती प्रवासी श्री. श्रीनिवास फलमारी यांच्याकडे सुखरूप परत केली.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या मौल्यवान वस्तूंचीही काळजी घेणाऱ्या पीएमपीएमएलच्या सेवकांच्या प्रामाणिकपणाला मनःपूर्वक सलाम!

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading