Monday, September 21, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंड: दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी वाढून झाली असती अंदाजे ७.२५ कोटी रुपये

मुंबई : आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडची (एबीएसएलएएमसी) स्थापना १९९४ मध्ये झाली. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाईफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट्स इंक. हे कंपनीचे प्रमोटर्स आणि प्रमुख भागधारक आहेत. एबीएसएलएएमसी प्रामुख्याने आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडची गुंतवणूक व्यवस्थापक आहे, जी भारतीय विश्वस्त कायदा, १८८२ अंतर्गत नोंदणीकृत ट्रस्ट आहे. मालमत्ता व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंडाने ३३.५० लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह दरमहा १०,००० रुपयांच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) अंदाजे ७.२५ कोटी रुपयांचा परतावा सादर केला आहे. या फंडाने दीर्घकालीन एसआयपी परतावा दिला असून, १० वर्षांच्या गुंतवणूक कालावधीत एसआयपी परताव्याचा डेटा १४.३६ टक्‍के सीएजीआर दर्शवतो.

२७ ऑगस्ट १९९८ रोजी लाँच झालेल्या आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंडाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य १.९८ कोटी रुपयांपर्यंत वाढवले आहे, जे सुमारे २७ वर्षांत १९८.५२ पट संपत्ती निर्मिती दर्शवते. या फंडाने स्थापनेपासून २०.७७ टक्‍के सीएजीआर परतावा दिला आहे, ज्याची तुलना निफ्टी ५०० टीआरआयने दिलेल्या १५.५९ टक्‍के सीएजीआरशी केली जाते.

आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंड हा लार्ज-कॅपवर अधिक भर असलेला एक वैविध्यपूर्ण फ्लेक्सी-कॅप फंड आहे आणि लार्ज-कॅप शेअर्समध्ये ६० टक्‍के ते ७५ टक्‍क्‍यांचे शिस्तबद्ध वाटप करतो. त्याचा पोर्टफोलिओ पाच गुंतवणूक विभागांद्वारे तयार केला गेला आहे – बेंचमार्क अवेयर, बेस्ट ऑफ ब्रीड, गुड टू ग्रेट, बॅड टू गुड आणि रिलेटिव्ह रिटर्न ज्यामुळे फंडाला बेंचमार्क जागरूकतेसह सक्रिय, बॉटम-अप आणि धोरणात्मक संधींचा मेळ घालणे शक्य होते. गेल्या १८ महिन्यांत, अलीकडील करेक्शननंतर व्हॅल्युएशन्स सामान्य झाल्याने काउंटर-सायक्लिकल पद्धतीने मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील गुंतवणूक वाढवून फंडाने आपल्या पोर्टफोलिओचे उत्तमरित्या रिबॅलेंसिंग केले आहे.

संपत्ती निर्मिती अभ्यासाबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लि.चे सीआयओ – इक्विटी श्री. हरिश कृष्णन म्हणाले, “मार्केट कॅपिटलायझेशनमधील लवचिकता ही विविध बाजारपेठ चक्रांमध्ये विशेषतः मौल्यवान असते, जी आम्हाला बदलत्या मूल्यांकनांना प्रतिसाद देण्याची आणि संपूर्ण इक्विटी स्पेक्ट्रममध्ये आम्हाला सर्वात आकर्षक वाटणाऱ्या संधींकडे भांडवल वळवण्याची संधी देते. आमचा दृष्टिकोन मूलभूत संशोधन, मूल्यांकन शिस्त आणि सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनावर आधारित आहे, ज्यामध्ये कालावधीनुसार मूल्य वाढवू शकणारे व्यवसाय ओळखण्यावर भर दिला जातो. एप्रिल-सप्टेंबर २०२४ दरम्यान व्हॅल्युएशन्स उंचावलेली असताना कमी वाटप ठेवल्यानंतर, बदलती व्हॅल्युएशन्स आणि बाजारातील संधींना प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या फंडाच्या पोर्टफोलिओचे सक्रियपणे रिबॅलेंसिंग केले आहे. बाजारातील घसरणीनंतर, व्हॅल्युएशन्स सामान्य झाली आणि दीर्घकालीन सरासरीच्या जवळ आली, ज्यामुळे एक अधिक पक्का प्रवेश बिंदू निर्माण झाला. या दृष्टिकोनाने वेगवेगळ्या बाजार चक्रांमध्ये भक्कम परतावा देण्याच्या आमच्या फंडाच्या क्षमतेला पाठबळ दिले आहे; ज्यामध्ये निफ्टी ५०० टीआरआयच्या १५.१३ टक्‍क्‍यांच्या तुलनेत फंडाचा ५ वर्षांचा रोलिंग रिटर्न १९.९१ टक्‍के राहिला आहे.”

श्री. हरिश कृष्णन आणि श्री. धवल जोशी यांच्याद्वारे व्यवस्थापित या योजनेचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अॅसेट अंडर मॅनेजमेंट २९,०४४ कोटी रुपये होते. जवळपास तीन दशकांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेला आदित्य बिर्ला सन लाईफ फ्लेक्सी कॅप फंड सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध वाटपाद्वारे बाजारातील बदलत्या परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यावर भर देणे सुरूच ठेवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading