“त्या मंचावर मी एक वाक्य बोलले हा पुरस्कार मला माझ्या आईच्या हातून मिळाला असता तर…” – शरयू सोनावणे”
२०२४ मध्ये मालिका विश्वात ‘पारू’ आणि ‘शिवा’ चा डंका सर्वत्र होता. या मालिकांच्या नायिका शरयू सोनावणे आणि पूर्वा कौशिक यांचं २०२४ वर्ष कसं होतं हे या दोघीनी सांगितले. ‘पारू म्हणजेच शरयू ’ म्हणाली “२०२४ चा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा माझ्यासाठी संस्मरणीय होता. तो प्रसंग मला अजून लक्षात आहे. मला सर्वात्कृष्ट मुलगी हा पुरस्कार मिळाला, आणि जेव्हा तो पुरस्कार घ्यायला मी स्टेजवर गेले तेव्हा एक विडिओ सुरु झाला ज्यात माझी आई माझ्या कामाच्या प्रवासा बद्दल बोलत होती. जे माझ्यासाठी अनपेक्षित होते कारण मला याची कल्पना नव्हती. तो विडिओ संपल्यावर मला एक प्रश्न विचारला गेला कि तुझ्यासाठी हा पुरस्कार का खास आहे, मी म्हणाली माझ्या आईची खूप इच्छा होती कि झी मराठीवर मी काम करावे आणि तिची अधिक इच्छा होती झी मराठी अवॉर्ड्सला यायची. त्या मंचावर मी एक वाक्य बोलली कि हा पुरस्कार मला माझ्या आईच्या हातून मिळाला असता तर आवडले असते आणि अचानक माझी आई स्टेजवर आली. तो क्षण माझ्या आयुष्यातला खूप खास आणि भावुक क्षण आहे आणि सदैव राहील.मी कधीच विचार केला नव्हता कि माझ्यासोबत असं होईल. २०२४ मध्ये राहिलेली गोष्ट म्हणजे २०२३ मध्ये माझं लग्न झाले तर आमचं प्लांनिंग होत कि भारताच्या बाहेर फिरायला जायचे पण तसं काही झाले नाही. माझी मालिका ‘पारू’ सुरु झाली आणि त्यात मी व्यस्त झाले. मला असं ही वाटत कि पारू ची भूमिका मी अजून छान निभावू शकीन.”
‘शिवा’ म्हणजे पूर्वा कौशिक म्हणाली, “२०२४ मध्ये ‘शिवा’ मालिकेचं चित्रीकरण सुरु झाले, जशी शिवा घडत होती तशी मी ही घडत गेली. ‘शिवा’ मुळे खूप काही नवीन शिकायला मिळत आहे, बऱ्याचदा असं होत की अनेक गोष्टी मला करता येत नव्हत्या पण शिवामुळे त्यागोष्टी करण्यासाठी एक वेगळीच ताकत मिळत गेली. मी शिवामुळे न घाबरता आपले मत मांडायला शिकले. माझी बेस्ट कामगिरी ही पण शिवासाठी मला मिळालेला बेस्ट नायिकेचा पुरस्कार. इतक्या महिन्याचा मेहनतीचा प्रवास त्याची ही पोचपावती म्हणायला हरकत नाही, यासाठी झी मराठी आणि जगदंब प्रोडक्शनची ऋणी आहे. माझ्या स्वभावातल्या काही गोष्टी अजून सुधारायचा प्रयत्न सुरु आहे, कारण माझा जो स्वभाव आहे मी ट्रान्स्परन्सीने वागणारी आहे आणि कधी-कधी त्या गोष्टी मलाच नडतात. तर यागोष्टीं आणखीन छान कश्या करायच्या या वर माझं काम चालू आहे. २०२४ मध्ये राहून गेलेली गोष्ट म्हणजे मला माझं भरतनाट्यमच शिक्षणपूर्ण करायचा आहे. मी त्यात डिप्लोमा केला आहे. त्यासोबत मला मराठी प्रायोगिक किंवा व्यावसायिक नाटक करायचे आहे. या दोन गोष्टीना २०२४ मध्ये वेळ देता आला नाही. पण येत्या वर्षात मी ते पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन.”
तेव्हा बघायला विसरू नका ‘पारू” संध्या ७:३० वा. आणि ‘शिवा’ ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
