Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

कलेच्या विद्यार्थ्यांमध्ये मी कायमच रमतो -पंडित हरिप्रसाद चौरसिया

 

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ख्यातनाम बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा सन्मान भारतीय विद्यापीठ स्कूल परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि शिकविण्यातच मी रमतो. संगीत ही निरंतर चालणारी कला आहे. या कलेच्या विद्यार्थ्यांमध्ये मी कायमच रमतो, अशी भावना ज्येष्ठ बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी भारती विद्यापीठ स्कूल परफॉर्मिंग आर्ट्स विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते भारती विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. विवेक सावजी ,भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख प्राध्यापक शारंगधर साठे यावेळी उपस्थित होते. डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शारंगधर साठे म्हणाले, बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत विद्यार्थ्याना संवाद साधता यावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची कला आणि साधनेतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयाचे उपक्रम, अध्यापन पद्धती, आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशाची माहिती घेत त्यांनी त्यांचे कौतुक केले. गुरू-शिष्य परंपरेचे पालन, तसेच अध्यापन पद्धती व संगीत व नृत्यासाठी लागणारे वातावरण पाहून त्यांनी प्रशंसा केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading