Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

ऊस्ताद जाकीर हुसेन यांना 30 डिसेंबर रोजी श्रद्धांजली

पुणे : दि.१५ डिसेंबर रोजी ऊस्ताद जाकीर हुसेन यांनी आपला अखेरचा श्वास सॅन फ्रान्सिस्को येथील U.C.S.F मेडिकल सेंटर मध्ये घेतला .त्यांचे अंत्यदर्शन आपल्या सर्वांना होईल असे वाटत होते . परंतु कुटुंबाने सॅन फ्रान्सिस्को येथेच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील तमाम रसिक श्रोते व त्यांचे चाहते निराश झाले . पुण्यातील ‘सा’ व ‘नी’ संस्थेनी त्यांना ‘’श्रद्धांजली’’ वाहण्याचे आयोजन केले असून पुण्यातील व मुंबईतील नामवंत कलाकार पं. हरिप्रसाद चौरसिया,पं.सुरेश तळवलकर, उ.शाहीद परवेज, पं. योगेश समशी, पं. सिल्वा गणेश, पं. राकेश चौरसिया, विदुषी देवकी पंडित, व इतर अनेक मान्यवर कलाकार , जाकीरजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहेत काही मान्यवर व्हिडीओ मार्फत श्रद्धांजली वाहणार आहेत आणि विशेष म्हणजे या श्रद्धांजली सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाकीरजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यास मिळणार आहे , असे ‘सा’ व ‘नी’ चे सुरेंद्र मोहिते यांनी सांगितले आहे .

हा ‘’शब्दपुष्पांजली’’ वाहण्याचा कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता , पंडित फार्म डी.पी.रोड नवसह्याद्री पुणे येथे होणार असून सर्व रसिकांना आपल्या लाडक्या जाकीरजींच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना पुष्पवाहण्यास उपस्थित राहावे अशी विनंती सर्व कलाकारांतर्फे सुरेंद्र मोहिते यांनी केली आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading