Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद मिळताच मार्केटयार्डात पेढे भरवून जल्लोष


पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात शहरातील पर्वती मतदार संघातील आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी जल्लोष व्यक्त करण्यात आला. फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर व समन्वयक सागर भोसले यांनी फुलबाजारातील अडते, हमाल, खरेदीदार यांसह अन्य बाजार घटकांना पेढे भरवून मंत्री पदाचा आनंद व्यक्त केला. आशिया खंडातील क्रमांक एकची बाजार समिती असा नावलौकीक असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी, फळे, फुले, गुळ-भुसार, केळी बाजार पर्वती विधानसभा मतदार संघात येतो. येथून निवडून आलेल्या आमदार मिसाळ यांना मंत्रीपदी वर्णी लागल्याने येत्या काळात बाजारातील सर्व अडचणी सुटून अन्य प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष वीर यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading