Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते, मंडप परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी भाविकांची गर्दी वाढत असताना कचऱ्याचे प्रमाणही वाढते. अशा वेळी उत्सवाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता कर्मचारी सातत्याने पार पाडतात. त्यांच्या श्रमाची दखल घेत शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे २२ महिला आणि २८ पुरुष अशा ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना साडी-चोळी, तर पुरुष कर्मचाऱ्यांना पोशाख देऊन गौरविण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड उपस्थित होते.

समीर गायकवाड म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात नागरिक आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. या काळात परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी सातत्याने मेहनत घेतात. उत्सव सुरळीत पार पडण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही मंडळाची सामाजिक जबाबदारी आहे, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading