माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचे निधन
पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी पुणे शहर चिटणीस प्रवीण ऊर्फ विनोद कृष्णराव वस्ते (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
वस्ते यांनी २००२ ते २००७ या कालावधीत पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून लक्ष्मीनगर (पर्वती) भागाचे प्रतिनिधित्व केले. पुणे शहर भाजपचे चिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे. पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांचे ते दीर होत.
वस्ते यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
