Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सस्पेन्स संपला; एकनाथ शिंदे घेणार शपथ

मुंबई: आज होत असलेल्या शपथविधी समारंभात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून शपथ घेणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. शिरसाट यांच्या या स्पष्टीकरणामुळे राजकीय क्षेत्रात ताणलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळून देखील तब्बल तेरा दिवस मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामागे मुख्यमंत्री पदाचा पेच जेवढा कारणीभूत होता, तेवढीच एकनाथ शिंदे यांची गृहमंत्री पदाची मागणी देखील कारणीभूत होती. मुख्यमंत्री पदाबाबत शिंदे यांचा कोणताही आग्रह नसला तरी देखील गृहमंत्री पदाबाबत ते ठाम होते.

काल झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा आग्रह सोडल्याचे सांगण्यात आले. महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित पवार या तिघांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा देखील केला. मात्र, शिंदे यांनी आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही, हे गुपितच ठेवले. मात्र, शिरसाट यांनी शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading