Monday, June 8, 2026
Latest NewsLIFESTYLE

विज्ञान, कला, निसर्ग यांची अनुभूती देणाऱ्या ‘ट्रॅव्हलिंग प्लांट्स’ प्रदर्शनाचे आयोजन


पुणे : विज्ञान, कला, निसर्ग यांची अनुभूती देणाऱ्या आणि वनस्पती जगताचे अंतरंग उलगडणाऱ्या ‘ट्रॅव्हलिंग प्लांट्स’ प्रदर्शनाचे आयोजन रेस कोर्स जवळील इम्प्रेम गार्डन  येथील रूपा राहुल बजाज सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अँड आर्ट येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला सुरुवात झाली असून १८ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायं ६ दरम्यान इच्छुकांना ते पाहता येणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची कृपया नोंद घ्यावी. ‘ट्रॅव्हलिंग प्लांट्स’ हे प्रदर्शन लीना व्हिंसेंट यांनी क्युरेट केले असून हे प्रदर्शन ग्योथं इन्स्टिट्यूट, मॅक्स म्युलर भवन यांच्या ट्रान्सडिसिप्लिनरी प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

नवी पिढी निसर्गाशी जोडली जावी यासोबतच त्यांना आपल्या आजूबाजूला असलेली परिसंस्था आणि वनस्पतींचे सखोल आकलन व्हावे हा या प्रदर्शनामागील हेतू आहे. येणाऱ्या काळात निसर्गाचे जतन व्हावे यासाठी असलेली सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता विचारात घेत समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये ५ कलाकारांची कला प्रदर्शित करण्यात आली असून यामध्ये वनस्पती जीवनाच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय आयामांचे प्रतिबिंब रसिक प्रेक्षकांना पाहता येईल. प्रदर्शना सोबतच या दरम्यान अनेक कार्यशाळा, स्थळ भेटी, मान्यवर वनस्पतीतज्ज्ञांची व्याख्याने, कलाकारांशी संवाद यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. प्रदर्शन ठिकाणी करण्यात आलेले मोठाले इंस्टॉलेशन्स हे खास आकर्षण ठरेल असा आयोजकांचा विश्वास आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading