Wednesday, September 23, 2026
Latest NewsPUNE

आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

– उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

पुणे  : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (IAS) यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका मुख्यालयातील उपमहापौर कार्यालयात सदिच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे स्वागत करून लोकप्रतिनिधी व पुणेकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते आयुक्त नवल किशोर राम यांचा शाल आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट देण्यात आले. अशोक स्तंभ आणि भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले हे स्मृतीचिन्ह काचेच्या पेटीत जतन करण्यात आले आहे.

या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सत्कार सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी उपमहापौर व आयुक्त यांच्यात पुणे शहरातील आगामी पायाभूत सुविधा, नागरी विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सुसंवादातून शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading