Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

गोल्फ क्लब मंडळाच्या गणेश आरतीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची हजेरी

 

पुणे : गोल्फ क्लब मंडळाच्या वतीने आयोजित श्री गणेश आरतीला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांचे स्वागत केले.

या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ इक्रम खान यांनी पोकीस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्वागत केले .यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष जाधव ,सचिव प्रवीण सिंग ,राजेंद्र देशमुख,गणेश शेंडे,राजेश वाघमारे ,विकी सोनवणे ,दिपक तटकरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आरतीनंतर उपस्थितांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, शांतता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading