Tuesday, September 22, 2026
BusinessLatest News

पॉकेटफुलकडून पुण्यात नवीन शाखेचे उद्घाटन, महाराष्ट्रातील उपस्थितीचा केला विस्‍तार

पुणे : पॉकेटफुल या सेबी-नोंदणीकृत नेक्स्ट-जनरेशन इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मने पुण्यात आपली नवीन शाखा डीएनके स्क्वेअर, रामवाडी चौक, एयरपोर्ट रोड, पुणे येथे सुरू केली आहे. यासह कंपनीने महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे. राज्यातील मोठ्या संख्येने गुंतवणूकदार आधीच कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना हे नवीन कार्यालय कंपनीला विद्यमान ग्राहकांशी अधिक दृढ संबंध निर्माण करण्यास आणि पुण्यातील बाजारपेठेतील सहभागी, उद्योजक व सक्रिय ट्रेडर्सच्या वाढत्या समुदायाशी जोडले जाण्यास मदत करेल.

हे नवीन कार्यालय व्यवसाय विकास, ग्राहक संपादन आणि धोरणात्मक सहयोगांसाठी स्थानिक केंद्र म्हणून कार्य करेल. आपल्या विस्ताराचा भाग म्हणून, पॉकेटफुल विक्री, रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि इतर व्यवसाय-संबंधित विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. ही टीम ग्राहकांशी संवाद अधिक सुलभ संवाद साधण्यासाठी, व्यवसायाच्या नवीन संधी शोधण्यासाठी आणि पुण्याच्या आर्थिक व व्यावसायिक परिसंस्थेमध्ये परस्‍परसंबंध निर्माण करण्यासाठी काम करेल.

पुण्यातील हे कार्यालय शहरातील अधिकाधिक जाणकार गुंतवणूकदार वर्गाच्या गरजा पूर्ण करण्याच्या पॉकेटफुलच्या प्रयत्नांनाही पाठबळ देईल.कंपनीची प्रीमियम सेवा लेजेंड्स सानुकूलित ब्रोकरेज रचना आणि निवडक प्रायव्हेट-मार्केट संधींचा लाभ उपलब्ध करून देते. ही सेवा अधिक विशेषीकृत गुंतवणूक अनुभवाच्या शोधात असणारे सक्रिय ट्रेडर्स, सीएक्सओ, अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि फॅमिली ऑफिसेसच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.

या घडामोडीबाबत मत व्यक्त करत पॉकेटफुलचे सर्वम गोयल म्हणाले, “आम्हाला पुण्यासारख्या गतिमान आर्थिक परिसंस्था आणि अधिकाधिक माहितीपूर्ण गुंतवणूकदार समुदाय असलेल्या शहरात आमची प्रत्यक्ष उपस्थिती अधिक दृढ करताना अत्यंत आनंद होत आहे. या पुढाकारामधून आमचे डिजिटल व्यासपीठ आणि दृढ स्थानिक उपस्थिती यांची सांगड घालण्याचे आमचे व्यापक धोरण दिसून येते. यामुळे आम्हाला बाजारपेठेच्या गरजा अधिक बारकाईने समजून घेणे आणि ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करणे शक्य होईल. आम्ही पुण्यामध्ये सक्षम टीम उभी करण्यासाठी, तसेच पुण्यातील बदलत्या गुंतवणूक क्षेत्रात योगदान देण्यासाठी उत्सुक आहोत.”

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली आणि नोएडा व चेन्नईमध्ये कार्यरत कार्यालये असलेली पॉकेटफुल प्रमुख बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती अधिक दृढ करत आहे. देशभरात विस्तृत नेटवर्क उभे करताना कंपनी पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्येही प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याची योजना आखत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading