मुंबई : गोदरेज एंटरप्रायझेस समुहाचा भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयस कंपनीच्या अप्लायन्सेस विभागाने आपल्या उत्पादन क्षमतेचा मोठा विस्तार केला आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारीत पूर्ण स्वयंचलित फ्रंट-लोड वॉशिंग मशीन या नवीन उत्पादनाच्या श्रेणीसाठी कंपनीने पुण्याजवळील शिरवळ येथे नवीन कारखाना सुरू केला आहे. सुमारे एक लाख चौरस फूट जागा व्यापणाऱ्या या कारखान्यात नवीन सुविधा, यंत्रसामग्री, इतर साधने, पायाभूत सुविधा आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन यांच्यासाठी कंपनीने सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शिरवळ येथील या पूर्णपणे स्वयंचलित सुविधा असणाऱ्या कारखान्यामुळे गोदरेज अप्लायन्सेस बाजारपेठेत फ्रंट-लोड वॉशिंग मशीन्सची तीन लाख युनिट्स वर्षाकाठी उतरवू शकेल. त्यामुळे या ब्रँडचे स्वयंचलित वॉशिंग मशीन पोर्टफोलिओचे उत्पादन जवळजवळ दुप्पट होईल. या ‘ग्रीनको प्लॅटिनम प्लस’ प्रमाणित कारखान्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स, सेमी आणि टॉप-लोड वॉशिंग मशीन, मेडिकल रेफ्रिजरेटर्स, इन्सुलीकूल आणि क्यूब यांसारखी इतर उपकरणेदेखील तयार करण्यात येतात. नवीन असेंब्ली लाईनविषयी माहिती देताना ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “नवीन एआय सक्षम उत्पादन श्रेणी ही भारतीय ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्णतेची आमची कटिबद्धता अधोरेखित
Read More