Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

पुण्याचे यश महापती आणि तेजस जामदार यांना अकारा स्पर्धेत रौप्यपदक

पुणे : पद्मभूषण डॉ. वसंतदादा  पाटील  कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एशियन कॉन्टेस्ट ऑफ आर्किटेक्चरल रूकीज अवॉर्ड म्हणजे  ‘अकारा  या स्पर्धेत  मुंबईतील स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड आर्किटेक्चरचा शर्विन जंगले आणि  कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचा ओम नाईक यांनी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. या दोन विजेत्यांना आशिया स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा यश महापती आणि तेजस जामदार तसेच  मुंबई मधील  कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ची खुशी छाजेड यांनी रौप्य पदक पटकाविले.

ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा झाली. सर्व समीक्षकांचे अणि स्पर्धकांचे प्रा. शेखर गरुड यांनी स्वागत केले. प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांविषयी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड, सचिव विश्वस्त जितेंद्र पितालिया दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुवर्णपदक विजेत्यांना  १० हजार तर रौप्य पदक विजेत्यांना ५ हजार  रोख बक्षीस देण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी व सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ़ आर्किटेक्चर येथील, प्रा, गरिमा बुरागोहैन , प्रा, अनुश्री कुलकर्णी अणि प्रा, रवी मिश्रा यांनी केले.

भारतातील  ४ राज्यातील, १२ विविध  शहरातील, २३ नामांकित वास्तूकला महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प या स्पर्धेत सादर केले. वास्तुरचनेबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेला काय साध्य करणे शक्य नाही? हा स्पर्धेचा विषय होता. जपानचे डॉ. याँगिल ली आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत.

प्रसन्न देसाई म्हणाले, अकारा स्पर्धेद्वारे वास्तुकलेच्या अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी उपलब्ध होते,  ज्यामुळे पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ही वार्षिक स्पर्धा नियमित आयोजित करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading