Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

‘एआय पॉवर्ड फ्रंट लोड वॉशिंग मशिन्स’साठी ‘गोदरेज अप्लायन्सेस’तर्फे पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन लाइनचे अनावरण

मुंबई : गोदरेज एंटरप्रायझेस समुहाचा भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयस कंपनीच्या अप्लायन्सेस विभागाने आपल्या उत्पादन क्षमतेचा मोठा विस्तार केला आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारीत पूर्ण स्वयंचलित फ्रंट-लोड वॉशिंग मशीन या नवीन उत्पादनाच्या श्रेणीसाठी कंपनीने पुण्याजवळील शिरवळ येथे नवीन कारखाना सुरू केला आहे. सुमारे एक लाख चौरस फूट जागा व्यापणाऱ्या या कारखान्यात नवीन सुविधा, यंत्रसामग्री, इतर साधने, पायाभूत सुविधा आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन यांच्यासाठी कंपनीने सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शिरवळ येथील या पूर्णपणे स्वयंचलित सुविधा असणाऱ्या कारखान्यामुळे गोदरेज अप्लायन्सेस बाजारपेठेत फ्रंट-लोड वॉशिंग मशीन्सची तीन लाख युनिट्स वर्षाकाठी उतरवू शकेल. त्यामुळे या ब्रँडचे स्वयंचलित वॉशिंग मशीन पोर्टफोलिओचे उत्पादन जवळजवळ दुप्पट होईल. या ‘ग्रीनको प्लॅटिनम प्लस’ प्रमाणित कारखान्यामध्ये रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स, सेमी आणि टॉप-लोड वॉशिंग मशीन, मेडिकल रेफ्रिजरेटर्स, इन्सुलीकूल आणि क्यूब यांसारखी इतर उपकरणेदेखील तयार करण्यात येतात.

नवीन असेंब्ली लाईनविषयी माहिती देताना ‘गोदरेज अप्लायन्सेस’चे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “नवीन एआय सक्षम उत्पादन श्रेणी ही भारतीय ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्णतेची आमची कटिबद्धता अधोरेखित करते. सध्या आम्ही वॉशिंग मशिन श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक आहोत. शंभर कोटी रुपयांच्या या नवीन गुंतवणुकीमुळे आम्ही आमची स्थिती आणखी मजबूत करू शकू. यावर्षी वॉशिंग मशिन्स विभागात दुप्पट वाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”


‘गोदरेज अप्लायन्सेस’च्या वॉशिंग मशिन्स उत्पादन गटाचे प्रमुख शशांक सिन्हा म्हणाले, “आमच्या संपूर्ण स्वयंचलित फ्रंट लोड वॉशिंग मशिन्सची ही नवीन श्रेणी भारतीय ग्राहकांची प्राधान्ये लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. भारतातील भौगोलिक व हवामानाची परिस्थिती, भारतीयांचा कौटुंबिक आकार, त्यांच्या धुण्याच्या सवयी यांचा विचार यांमध्ये झालेला आहे. ७ ते १० किलो क्षमतेच्या या प्रगत मशीन्स एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. ‘स्मार्ट लोड डिटेक्शन’ या वैशिष्ट्यामुळे हे मशीन कपडे धुवायला किती पाणी लागेल याचा नेमका अंदाज घेते आणि त्यातून पाण्याची पातळी समायोजित करून कपड्यांची उत्तम काळजी घेते. पाणी आणि उर्जेची बचतदेखील ते करते. त्यामुळे ग्राहकांना कपडे धुण्याचा उत्कृष्ट अनुभव मिळतो.”

गोदरेज अप्लायन्सेस या ब्रॅंडची सर्व उत्पादने ही विचारपूर्वक बनवलेली असतात. याचा पडताळा फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या श्रेणीमध्येही येतो. अनेक प्रगत वैशिष्ट्ये या उत्पादनात समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, स्टीम वॉश प्रोग्रॅममुळे कपडे खोलवर स्वच्छ होतात आणि २ दिवसांपर्यंतचे जुने, शंभराहून अधिक प्रकारचे डाग यातून धुतले जातात. रिफ्रेश प्रोग्रॅम कपड्यांना दुर्गंधीमुक्त करतो आणि फॅब्रिसेफ™ ड्रम हे वैशिष्ट्य विविध प्रकारच्या कपड्यांचा दर्जा राखण्यास मदत करते. याशिवाय, ही मशीन्स ३० मिनिटे जलद कपडे सुकवू शकतात**. फ्रंट लोड वॉशिंग मशिनची ही संपूर्ण श्रेणी ऑटो ड्रम क्लीन रिमाइंडर्ससह सुविधा देते. अँटी-रस्ट कॅबिनेट, ओव्हरफ्लो संरक्षण, २ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि १० वर्षांची मोटरवर वॉरंटी ही याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading