द स्लीप कंपनीचे १००वे स्टोअर ग्रॅण्ड गिव्हअवे: 45 मिनिटांमध्ये १०० मोफत स्मार्टग्रिड मॅट्रेसेस क्लेम करण्यात आले
मुंबई, भारतातील आघाडीचा कम्फर्ट-टेक ब्रँड द स्लीप कंपनीला (The Sleep Company) ३१ ऑगस्ट २०२४ रोजी जवळपास २५ लाख रूपये मूल्य असलेल्या त्यांच्या १०० मोफत मॅट्रेसेस गिव्हअवेसाठी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 1800 व्यक्तींनी स्मार्टग्रिड तंत्रज्ञानासह पेटण्टेड मोफत मॅट्रेसेसना क्लेम करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार द स्लीप कंपनी (TSC) स्टोअर्सना भेट दिली, ज्यामधून कंपनीच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी उल्लेखनीय उत्साह दिसण्यात आला. द स्लीप कंपनीने ऑफर कालावधीदरम्यान स्टोअर्सना भेट दिलेल्या मुंबईकरांना मोफत पिलो (उशी) देत अधिक आनंदित केले, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी कंपनीच्या उत्पादनांच्या आरामदायीपणाचा अनुभव घेण्याची खात्री मिळाली.
ही ऑफर मुंबईतील कांदिवली, ठाणे, आर सिटी मॉल आणि बांद्रा येथील चार TSC स्टोअर्समध्ये उपलब्ध होती. कंपनीने मुंबईसह दिल्ली-एनसीआर, चेन्नई आणि हैदराबाद या इतर मेट्रो शहरांमध्ये जवळपास १ कोटी रूपये किंमत असलेल्या मोफत मॅट्रेसेसच्या व्यापक गिव्हअवेसह भारतात १०० सीओसीओ (कंपनी-ओन्ड, कंपनी-ऑपरेटेड) स्टोअर्सच्या मोठ्या टप्प्याला साजरे केले. ऑफरचा दावा करण्यासाठी चारही शहरांमधील एकूण 6,000 लोकांनी TSC स्टोअरला भेट दिली आणि कंपनीने 400 गाद्या आणि 1,000 उशा दिल्या. TSCया चार शहरांतील रहिवाशांकडून 10,000 हून अधिक फोन कॉल्स आले, ज्याने या ऑफरबद्दल विचारणा केली, ज्यामुळे व्यक्तींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली.
या ऑफरच्या माध्यमातून कंपनीचा ग्राहकांना विनामूल्य त्यांच्या पेटण्टेड तंत्रज्ञानाच्या आरामदायीपणाचा अनुभव घेण्याची अद्वितीय संधी देण्याचा मनसुबा आहे.
द स्लीप कंपनीच्या सह-संस्थापक प्रियंका सलोट म्हणाल्या, ”आम्हाला व्यक्तींना उत्तम झोप मिळण्यास मदत करण्याच्या आमच्या मिशनअंतर्गत संपूर्ण भारतात ४०० मोफत मॅट्रेसेस देत १००व्या स्टोअर लाँचचा टप्पा साजरा करण्याचा आनंद होत आहे. ही भेट मुंबई, दिल्ली-एनसीआर, चेन्नई आणि हैदराबाद येथे आयोजित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये, आम्ही बेंगळुरूमध्ये अशाच प्रकारचे गिव्हअवे आयोजित केले, ज्यामुळे भारतातील या सर्वात मोठ्या मॅट्रेस गिव्हअवेची किंमत एकूण १.२५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. आम्ही ग्राहकांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आमच्या विकास प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि यामधून आमचे त्यांच्यासोबत असलेले दृढ नाते दिसून येते. मुंबईसह प्रमुख मेट्रो शहरांमधील व्यक्तींना त्यांची व्यस्त व धावपळीच्या जीवनशैलींमुळे झोपमोडीचा सामना करावा लागतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा व्यक्तींना आमची पेटण्टेड स्मार्टग्रिड मॅट्रेस घरी घेऊन जाण्याची आणि दशकभर सर्वोत्तम स्लीपिंग अनुभव घेण्याची संधी देण्याचा मनसुबा आहे.”
हा उपक्रम अधिकाधिक ग्राहकांकरिता TSCच्या अत्याधुनिक आरामदायी सोल्यूशन्स सादर करण्यासाठी आणि कंपनीच्या विकासामध्ये साह्यभूत असलेल्या निष्ठावान ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी डिझाइन करण्यात आला. या स्पेशल गिव्हअवेमधून प्रमुख मेट्रो शहरांमधील, विशेषत: व्यस्त जीवनशैलीमुळे झोपमोडीचा सामना कराव्या लागणाऱ्या मुंबईतील व्यक्तींचा झोपेचा अनुभव सुधारण्याप्रती कंपनीचा उद्देश दिसून येतो.
