सूरज आणि पॅडीची गोलीगत मस्ती पाहिलीत का?
Bigg Boss Marathi Day 38 : ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज आणि पॅडी एकमेकांसोबत गोलीगत मस्ती करताना दिसणार आहेत. आज पॅडी दादा सूरजला म्हणत आहेत,”पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करणार आहे”. त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो,”तुम्ही काहीही करा..मी भीत नाही. मी घरातल्या कोणालाच भीत नाही”. सूरज पुढे गंमतीत म्हणतो,”मी तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका”. त्यावर पॅडी दादा सूरजला म्हणतात,”तू किंग आहेस काहीही करू शकतोस”. ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून सूरज प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता सूरज आणि पॅडीची गोलीगत मस्ती प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
