Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय वळण – चित्रा वाघ

मुंबई : बदलापूर (Badlapur crime) येथील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार हा निश्चितपणे निंदनीय प्रकार असून त्याचा निषेध करणे स्वाभाविकच आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत रस्त्यावर उतरलेले नागरिक बदलापूरकरच होते. त्यानंतर मात्र मुंबईहून आलेली माणसे या आंदोलनात उतरली आणि या आंदोलनाला राजकीय वळण देण्यात आले, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.

घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेला तीन ते चार तास लागले. त्यानंतर केवळ चार-पाच वर्षाच्या ज्या मुलींना आपल्या शरीराची ओळख देखील नाही, त्यांना बोलते करण्याचे कौशल्य पोलिसांनी दाखवले. हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला. एफ आय आर दाखल झाल्यानंतर केवळ दोन तासात आरोपीला जेरबंद करण्यात आले. या प्रकरणासाठी उज्वल निकम यांच्यासारखा कसलेला वकील सरकारच्या वतीने देण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. याप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार म्हणून जे काही करणे शक्य होते ते करण्यात आले आहे, अशा शब्दात वाघ यांनी सरकारने उचललेल्या पावलांचे समर्थन केले.

या प्रकरणाच्या निषेधार्थ जे आंदोलन झाले त्यात सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व बदलापूरकर नागरिक होते. स्थानिक आमदार किसन कथोरे या आंदोलनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रक्रियेत सहभागी होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे देखील बदलापूर येथे दाखल झाले. त्यानंतर मात्र हे आंदोलन हायजॅक करून त्याला राजकीय वळण देण्यात आले. या प्रकरणाच्या निषेदासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलकांच्या हाती मुख्यमंत्री लाडकी बहीण यजना रद्द करा, अशी मागणी करणारे फलक होते. अशाप्रकारे आंदोलनाला वेगळे वळण लावणे चुकीचे आहे, असे चित्रा वाघ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading