Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीची 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : बदलापूर (Badlapur) येथील शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्याकडून दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक महाविकास आघाडीने दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

बदलापूर येथे घडलेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून द्रुतगती न्यायालयात त्याची सुनावणी केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलन रेल्वे रुळावरून उठत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही आंदोलकांना पोलिसांनी अटकही केली आहे. कल्याण येथील वकिलांच्या संघटनेने शिंदे याचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खटले दाखल झालेल्या आंदोलकांचे खटले विनामूल्य लढण्याचाही निर्णय वकील संघटनेने घेतला आहे.

बदलापूर येथील या प्रकरणाचे पडसाद राज्यात विविध ठिकाणीही उमटले आहेत. बदलापूर पाठोपाठ पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे जळगाव आणि सांगली येथेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आता महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading