Sunday, June 7, 2026

Day: August 23, 2024

ENTERTAINMENTLatest News

“सयाजीरावचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना नरसिंहरावची आठवण आली”- सुनील बर्वे

प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका ‘पारू’ या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे.मराठीताल लाडका अभिनेता सुनील बर्वे झी मराठीवर ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा  पदार्पण करत आहे. या निमित्ताने सुनीलनि झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता व्यक्त करताना सांगितले, “झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती कारण झी मराठी मालिका विश्वातला पायनियर आहे आणि मी झी मराठी बरोबर एकदिलाने २०१२ पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी  दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली तेव्हा पासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या  करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे. सयाजीरावच्या भूमिकेसाठी  मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे.  जेव्हा सयाजीरावचा प्रोमो आला तेव्हा खूप जण म्हणत होते की नरसिंहराव परत आला. प्रेक्षकांना अजूनही माझी ११ वर्षापूर्वीची ‘कुंकू’ मालिका लक्षात आहे. मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे. मला जेव्हा ‘पारू’ मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे याचा आनंद झाला. प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे. आणखीन बोलायचे झालं  तर सयाजीराव आपल्या तत्वांशी बांधलेला आहे,  कुटुंबावरचं आणि त्याच्या बहिणीवरचं  प्रेम तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. एकदम छान व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. पण त्याच्या मनात जर कोणाविषयी राग असेल तर तो व्यक्त ही होतो आणि त्या व्यक्ती पासून दूरही  राहतो. सातारा मध्ये शूटिंग करण्याचा अनुभव ही वेगळा आहे. जेव्हा तुम्ही घरा पासून दूर राहून शूट करता तेव्हा ती मालिकेची टीम तुमच्या परिवारासारखी होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आऊटडोअर काम करायची मज्जा असते तशीच मज्जा आहे. ‘पारू’ च्या कलाकार टीम मध्ये बहुतेक नवीन पिढी आहे  त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पद्धतींनी  काम करण्याची मला उत्सुकता आहे. टीव्ही माध्यमात बराच बदल झाला आहे. ती काम करण्याची पद्धत मला आत्मसात करून घ्याची आहे. खूप उत्सुक आहे मी त्यांच्यासोबत काम करायला. मुळात सातारा शहर खूप सुंदर आहे. मी  मनोरंजन दुनियेत ४ दशके पाहिली आहेत टीव्ही माध्यामात खूप बदल पाहिला आहे. तंत्रज्ञानापासून ते दृष्टिकोनापर्यंत, क्रिएटिव्ह ते मार्केटिंगच वर्चस्वापर्यंत मी अनुभवलेल्या सर्व गोष्टी मनोरंजन दुनियेत  अनेक वर्षांमध्ये पहिल्या आहेत. आताची पिढी या माध्यमाला सरावलेली आहे, त्यांचा कॅमेरासमोरचा आत्मविश्वास आणि आत्मीयता बघण्यासारखी आहे. त्यांच्या सोबत कामकारण्याची एक वेगळीच मज्जा आहे. मी नवीन गोष्टींसाठी नेहमीच उत्सुक असतो, बदल अपरिहार्य आहे असे मी मानतो आणि बदलाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बदल कोणताही असला तरी तो सकारात्मकपणे घेतला पाहिजे.  पण हे ही नक्की की मालिका, चित्रपट किंवा कोणतीही भूमिका करण्याच्या  मुख्य ध्येयापासून आपण विचलित होता  कामा नये. मी ही ‘पारू’ मालिकेत एका नवीन टीम सोबत, नवीन भूमिकेत काम करण्यासाठी आणि तुम्हा सर्वाना भेटण्यासाठी उत्सुक आहे.” बघायला विसरू नका ‘पारू’ संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

औंध परिसरातील चिखलवाडी भागातील प्रश्नांची सोडवणूक करणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे  : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील औंध परिसरात असणाऱ्या चिखलवाडी भागातील विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक  : महिला भगिनी म्हणजे आदिशक्तीच आहेत. त्यांच्यासाठी काही करता आले, हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी

Read More
Latest NewsPUNE

…म्हणून अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो – शरद पवार

पुणे: “जुन्या पिढीतील अनेक लोकांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी परिश्रम घेतले. माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल

Read More
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विभागाच्या ६ विद्यार्थ्यांची इरास्मस मुंडस (Erasmus Mundus) या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. गौरव

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवस्मारकासाठी राजभवनावर धडकणार संभाजी ब्रिगेडचा ‘कुदळ मोर्चा’

    पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. त्यांचे स्मारक राज भवनावर व्हावे, ही संभाजी

Read More
Latest NewsPUNE

बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण

Read More
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathavale) यांची तीसऱ्यांदा केंद्रीय

Read More
ENTERTAINMENTLatest News

बेरोजगारी आणि जॉब स्कॅम वर  भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट गणेशोत्सवात  होणार प्रदर्शित

 मराठी सण – उत्सवाला माराठी चित्रपट बघितले पाहिजे दिग्दर्शक अजिंक्य उपासनी यांचे आवाहन बेरोजगारी आणि जॉब स्कॅम हे आपल्या देशातील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा खोडा

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील कोणत्याही नेत्याचे नाव निश्चित करा. मात्र, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा

Read More
Latest NewsMAHARASHTRA

पंतप्रधानांना देशातील समस्यांबाबत प्रश्न विचारू नका; त्यांना जगाच्या समस्या सोडवायच्यात – खासदार संजय राऊत 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. महामानव आहेत. त्यांना जगाच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे त्यांना देशातील समस्यांबाबत प्रश्न

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर खुद्द शरद पवार यांनाच शंका

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रात झेड प्लस सुरक्षा ही खरोखरच त्यांच्या काळजीपोटी

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

महाविकास आघाडीच्या बंद मधून शरद पवार पक्षाची माघार

मुंबई : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

डाव्या व समविचारी पक्षांनी महाविकास आघाडीत सहभागी व्हावे – शरद पवार

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) झेंड्याखाली मतदारांना सक्षम पर्याय

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकदा सत्ता द्या, कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून देऊ – राज ठाकरे

यवतमाळ : सध्याच्या काळात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मतदारांनी एकदा सत्ता

Read More
Latest NewsMAHARASHTRA

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या सहअध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा :  प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यास शासनाने

Read More
Latest NewsPUNE

गणेश मंडळ कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुनीत बालन ग्रुपकडून ३ कोटींच्या निधीची घोषणा

पुणे : गणेश मंडळांचे आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही आता पुढाकार घेतला

Read More
ENTERTAINMENTLatest News

निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार?

निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार?

Read More
ENGLISH

Godrej & Boyce Launches India’s first Lithium-Ion powered forklift truck with fully Indigenous Battery Management System

Mumbai : Amid India’s rapid infrastructure development and the pressing need for green energy solutions, Godrej & Boyce, part of

Read More