Monday, November 9, 2026

Day: August 10, 2024

BusinessLatest News

सुझलॉनने भारतातील सर्वात मोठी मल्टीब्रँड रिन्युएबल एनर्जी ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा कंपनी रेनोममधील 51% हिस्सा घेतला विकत

पुणे: सुझलॉन समूह हा भारतातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा सोल्युशन देणारा समूह आहे. या समूहाने आज संजय घोडावत ग्रुप (SGG) कडून रेनोम एनर्जी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (“रेनोम”) मधील 76% स्टेक दोन टप्प्यांत अधिग्रहण करण्यासाठी निश्चित करार अंमलात आणले. रेनोम ही देशातील सर्वात मोठी मल्टी ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा (“MBOMS”) पुरवठादार आहे, ज्यामध्ये 1,782 MW विंडमध्ये, 148 MW सोलरमध्ये आणि 572 MW BOP मध्ये ग्राहक विभागांमध्ये देखरेखीखाली आहे. पहिल्या टप्प्यात 400 कोटी रुपयांच्या मोबदल्यात 51% स्टेक घेतले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात, सुझलॉन 260 कोटी रुपयांच्या मोबदल्यात पहिल्या टप्प्याच्या अधिग्रहणानंतर 18 महिन्यांच्या आत अतिरिक्त 25% भागभांडवल प्राप्त करेल. काही अटी पूर्वानुक्रमांच्या पूर्ततेच्या अधीन राहून हा करार करण्यात आला आहे. या धोरणात्मक अधिग्रहणामुळे रेनोमची मुख्य क्षमता मिळविण्यात मदत होईल आणि एक आघाडीचे स्वतंत्र सेवा प्रदाता (ISP) व मल्टी ब्रँड अक्षय ऊर्जा मालमत्तेचे संरक्षक बनण्यासाठी मदत होईल. हा करार रेनोमला आज देशातील 32 GW पेक्षा जास्त नॉन-सुझलॉन पवन ऊर्जा मालमत्ता लक्ष्य करण्याच्या मोठ्या संधीचा लाभ घेण्यास सक्षम करेल. सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी अधिग्रहणाबद्दल सांगितले की, “2030 पर्यंत 500 GW अक्षय ऊर्जा स्थापनेचे भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही विविध तंत्रज्ञानाचा समूह आणि विविध उत्पादनांच्या पवन टर्बाइनची बाजारपेठ पुढे जाताना पाहणार आहोत. रेनोम या डोमेनमधील एकल सर्वात मोठी खेळाडू म्हणून उदयास आली आहे आणि या मार्केट सेगमेंटमध्ये अधिक सामर्थ्य व क्षमता आहे. हे अधिग्रहण सुझलॉन समूहाच्या आपल्या देशाच्या अक्षय ऊर्जा मालमत्तेचे रक्षण करताना वाढीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.” “आम्ही आयएसपी म्हणून रेनोमकडील सामर्थ्याची प्रशंसा करतो आणि आम्ही संजय घोडावत समूहाला अशा दूरदृष्टीने आणि बांधिलकीने निर्माण केल्याबद्दल प्रशंसा करतो. संजयजी घोडावत हे सुझलॉन समूहाचे दीर्घकाळ शुभचिंतक आहेत आणि आम्ही एसजीजीसोबत यशस्वी भागीदारीची अपेक्षा करतो.” सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी म्हणाले, “सुझलॉनमध्ये आम्ही आमच्या सेवा व्यवसाय अनेक दशकांपासून मन लावून, लक्ष केंद्रित करून उभा केला आहे. ऊर्जा संक्रमण घडविण्यात कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्या सुझलॉन सर्व्हिसेस बिझनेसने सुझलॉन-मेक टर्बाइनवर लक्ष केंद्रित केले आहेच आणि आता रेनोमचे नॉनसुझलॉन मल्टी ब्रँड रिन्युएबल एनर्जी ॲसेट्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, आम्ही भारतीय अक्षय ऊर्जा ओएमएस क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक स्थान निर्माण करत आहोत. पवनऊर्जा O&M स्पेसमध्ये सर्व मल्टी-मेक ग्राहकांना सर्वोत्तम-इन-क्लास ग्राहक सेवा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी विशेष आयएसपी म्हणून रेनोमला समर्थन व बळकट करण्याचा आमचा मानस आहे.” “ताफ्याच्या आकाराच्या दृष्टीने रेनोमची उपस्थिती लक्षणीय आहे. स्वतंत्र सेवा प्रदाता (“ISP”) म्हणून पवन ऊर्जा O&M उद्योगातील आगामी संधी काबीज करण्यासाठी एक मजबूत दावेदार बनवितो. सुझलॉन समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी हिमांशू मोदी म्हणाले, “रेनोमचे अधिग्रहण सुझलॉन समूहात एक मौल्यवान भर घालत आहे. सुझलॉनचे कौशल्य, रणनीती आणि बाजारपेठेतील पोहोच यांना पूरक असलेले आयएसपी मार्केटमध्ये रेनोमचे नेतृत्व स्थान व रेनोमचा ताफा हे नफा अनेक पटीने वाढविण्यात मदत करू शकते. हे अधिग्रहण प्रकल्प, प्रतिभा, स्थाने आणि प्रणाली आणि प्रक्रियांच्या क्रॉसओव्हरच्या दृष्टीने समन्वय प्रदान करते, ज्यामुळे सुझलॉन ब्रँडचा फायदा घेण्याची संधी निर्माण होते व 29 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेला वारसा असलेल्या रेनोमला मार्केट लीडर म्हणून पुढे उभे होण्याची संधी मिळते. “भारताच्या अक्षय ऊर्जा उद्योगाचे भविष्य वेगाने वाढीसाठी सज्ज आहे. सुझलॉन समूहामध्ये आम्ही एकत्रित, परंतु स्वतंत्र मालमत्ता आणि कंपन्या मिळविण्याचा व तयार करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामुळे आम्हाला या क्षेत्राचे सर्वसमावेशक नेतृत्व करण्यात मदत होईल. संजय घोडावत ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, “गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत आम्ही रेनोमला आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बनविले आहे. सुझलॉन समूहासोबत जोडले जाण्याचा आमचा उद्देश हा आहे की, ब्रँड म्हणून रेनोमची अनेक पटींनी वाढ होत राहील आणि आमच्या विद्यमान व नवीन ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळेल. या धोरणात्मक वाटचालीमुळे रेनोमला सुझलॉन समूहासोबत वाढण्यासाठी प्लॅटफॉर्म तर मिळतोच, पण एसजीजीला त्याच्या एव्हिएशन, एज्युकेशन, कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि रिटेल या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची अनुमती मिळते. मला खात्री आहे की, सुझलॉन समूह रेनोमला आणखी उंचीवर नेईल.”

Read More
BusinessLatest NewsPUNE

सरकारने व्यापाऱ्यांसाठी ‘लाडके व्यापारी’ योजना जाहीर करावी

पुणे व्यापारी महासंघाची पत्रकार परिषदेत मागणी पुणे : व्यापारी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून तो नियमितपणे कर वसूल करून सदर

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्याच्या गणेशोत्सवात लोकसहभाग वाढविणे गरजेचे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

  पुणे : देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्व आहे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल, हे

Read More
BusinessLatest News

बजाज अलायन्झ Life eTouch सह सर्वसमावेशक संरक्षण

पुणे : मुदत विमा हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो पॉलिसीधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा, तसेच मानसिक शांतता

Read More
BusinessLatest News

कोरोमंडल इंटरनॅशनलने एस. शंकरसुब्रमण्यन यांना एमडी आणि सीईओ म्हणून दिली पदोन्नती

मुंबई  : कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या (CIL) संचालक मंडळाने आज पोषण व्यवसाय – कार्यकारी संचालक  एस. शंकरसुब्रमण्यम यांची 7 ऑगस्ट 2024 पासून कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे ​ व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली.  शंकरसुब्रमण्यन यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे आणि मुख्य वित्तीय अधिकारी व व्यवसायप्रमुख म्हणून त्यांचे यशस्वी

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेला निरोप  देताना खुशबू तावडेने केले नव्या उमाचे स्वागत !

पल्लवी वैद्य साकारणार नवीन उमाची भूमिका ! गेले वर्षभर ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला.  आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण  मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप देत आहे.  याला कारण ठरलंय खुशबूकडे असलेली एक गुड न्यूज. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. प्रत्येक स्त्री प्रमाणे खुशबूने आपला गरोदरपणाचा ७ महिन्याचा प्रवास काम करत पूर्ण केला. खुशबू कडून ऐकूया तिचा हा प्रवास कसा होता आणि मालिकेला निरोप देत असताना तिच्या मनात काय भावना आहेत. “उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. झी मराठी सोबत काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेने पूर्ण केली. २०२३ जुलै मध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु केले होत आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं.  ह्याचसोबत मला एक वेगळा प्रेक्षक वर्ग लाभला. उमा आणि ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ राहील. मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण, जितके सण आहेत तितके ह्या मालिकेत आणि सेट वर आम्ही साजरे केले. गंमत अशी की काही मालिका कधी- कधी आधी शूट करतात पण आमचं नेमकं ज्यादिवशी तो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेट वरती वेगळीच ऊर्जा असायची. अतिशय खास कारण आहे की मी उमाला आणि मालिकेला निरोप देत आहे. हा खरंच गुडबाय  आहे कारण खूप छान कारणांनी बाय बोलतेय.  मालिकेमुळे मला उमाई  म्हणून ओळख मिळाली आणि आता ह्या उमाईची   खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आली आहे. ह्या काळात ‘सारं काही तिच्यासाठी’ शूटिंग करण्याचा अनुभव अदभूत होता. सुरवातीला मला माहिती नव्हतं की हा प्रवास कसा असणार आहे. कारण सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी नाहीतर प्रोडक्शनसाठी ही, पण मी स्वतःला एक मंत्र समजावलं होता की आजचा दिवस आणि आजचा क्षण हा जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस नव्याने सामोरे जायचं आणि काम करायचं. शूट करताना मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली.  ह्या ८ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबु सापडली आणि मला ह्यासाठी प्रोडक्शन आणि झी मराठीचे खूप खूप आभार मानायचे आहेत. जसं ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली त्यांना जितका आनंद झाला तितकाच माझ्या झी मराठीच्या कुटुंबाला सुद्धा  झाला. प्रत्येकानी उत्तम प्रकारे मला प्रतिसाद दिला, हिम्मत वाढवली. सगळ्यात आधी मी झी मराठी प्रतिनिधींशी बोलले ही बातमी द्यायला. मी त्यांना विचारलं आता काय आणि आता कसं करूया. तेव्हा त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं, “कि काय करायचं, कसं करायचं ते तू आमच्यावर सोड, तू फक्त तुझी प्रेग्नंन्सी एन्जॉय कर, बाकी सगळं आपण सांभाळून घेऊ. प्रोडक्शन मध्ये स्मिता ताई आहेत त्या सेटवर भेटायला आल्या आणि भेटून मला अभिनंदन  करून सांगितले की आता फक्त स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यायची आंनदी राहायचं, पौष्टिक खायचं, काही लागलं  तर आम्हाला कळवं, बाकी सगळं आपण  सांभाळून घेऊ. पूर्ण टीम, डायरेक्टर सर , सह कलाकार, कॅमेरा मागची आमची टीम सर्वानी खूप छान साथ दिली म्हणून हा ८ महिन्यांचा प्रवास छान पार पडला. मी आयुष्यभर  झी मराठी आणि ‘सारं काही तिच्यासाठी ‘ च्या पूर्ण टीमची ऋणी राहीन. उमाचा प्रवास पुढे पल्लवी वैद्य सांभाळणार आहे, नवीन उमाची   भूमिका पल्लवी वैद्य साकारणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. माझी कायम ह्या मालिकेसाठी ही इच्छा आहे की मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे कारण मला ‘सारं काही तिच्यासाठी’ ने भरभरून दिले आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे. मला पल्लवीचे मनापासून आभार मानायचे आहेत.  मी पुन्हा एकदा लास्ट टाईम उमा म्हणून कृतज्ञतेने साइन ऑफ करेन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहू दे.” पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ दररोज संध्या. ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

उद्धव ठाकरे बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करताहेत – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

भाऊच्या धक्क्यावर रितेशने केली जान्हवीची बोलती बंद

‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा दुसरा भाऊचा धक्का खूप विशेष असणार आहे. पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची शाळा घेतली होती. तर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरक्षणाचे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांनी माझ्या नादी लागू नका, नाहीतर …. – राज ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो. मात्र, माझ्या नादी लागू नका.

Read More
Latest NewsPUNESports

बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ‘एसजीबीएफ’तर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे : सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमच्या वतीने प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेहवाल हिला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा

Read More
Latest NewsPUNE

शहराच्या सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी वास्तुविशारदच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी – महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे मत 

-ज्येष्ठ  वास्तुविशारद  संजय उमराणीकर यांना पहिला  “भारतीय कला प्रसारिणी सभा वास्तुविद्या जीवन गौरव पुरस्कार” प्रदान पुणे : भारतीय वास्तु कलेला

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र पुणे : जागतिक दर्जाचे ‘आयटी हब’ अशी ओळख

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

झाले गेले, गंगेला मिळाले; आता फक्त विकासावरच बोलणार – अजित पवार

शिर्डी:  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई:  मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.

Read More
Latest NewsPUNE

‘तालचक्र‌’ हे पुस्तक शास्त्रीयतेचा उलगडा करणारे : तालयोगी पं. सुरेश तळवलकर

पुणे : भारतीय संगीतात शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला ही आत्यंतिक महत्त्वाची अंगे आहेत. तबलासाधक आणि गुरू जानकीराम जगताप यांचे

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

अक्षरधाम बॉम्ब हल्ल्याच्या सूत्रधाराचे पुणे कनेक्शन उघड

अक्षरधाम बॉम्ब हल्ल्याच्या सूत्रधाराचे पुणे कनेक्शन उघड

Read More