सुझलॉनने भारतातील सर्वात मोठी मल्टीब्रँड रिन्युएबल एनर्जी ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा कंपनी रेनोममधील 51% हिस्सा घेतला विकत
पुणे: सुझलॉन समूह हा भारतातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा सोल्युशन देणारा समूह आहे. या समूहाने आज संजय घोडावत ग्रुप (SGG) कडून रेनोम एनर्जी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (“रेनोम”) मधील 76% स्टेक दोन टप्प्यांत अधिग्रहण करण्यासाठी निश्चित करार अंमलात आणले. रेनोम ही देशातील सर्वात मोठी मल्टी ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सेवा (“MBOMS”) पुरवठादार आहे, ज्यामध्ये 1,782 MW विंडमध्ये, 148 MW सोलरमध्ये आणि 572 MW BOP मध्ये ग्राहक विभागांमध्ये देखरेखीखाली आहे.
पहिल्या टप्प्यात 400 कोटी रुपयांच्या मोबदल्यात 51% स्टेक घेतले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात, सुझलॉन 260 कोटी रुपयांच्या मोबदल्यात पहिल्या टप्प्याच्या अधिग्रहणानंतर 18 महिन्यांच्या आत अतिरिक्त 25% भागभांडवल प्राप्त करेल. काही अटी पूर्वानुक्रमांच्या पूर्ततेच्या अधीन राहून हा करार करण्यात आला आहे. या धोरणात्मक अधिग्रहणामुळे रेनोमची मुख्य क्षमता मिळविण्यात मदत होईल आणि एक आघाडीचे स्वतंत्र सेवा प्रदाता (ISP) व मल्टी ब्रँड अक्षय ऊर्जा मालमत्तेचे संरक्षक बनण्यासाठी मदत होईल. हा करार रेनोमला आज देशातील 32 GW पेक्षा जास्त नॉन-सुझलॉन पवन ऊर्जा मालमत्ता लक्ष्य करण्याच्या मोठ्या संधीचा लाभ घेण्यास सक्षम करेल.
सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी अधिग्रहणाबद्दल सांगितले की, “2030 पर्यंत 500 GW अक्षय ऊर्जा स्थापनेचे भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही विविध तंत्रज्ञानाचा समूह आणि विविध उत्पादनांच्या पवन टर्बाइनची बाजारपेठ पुढे जाताना पाहणार आहोत. रेनोम या डोमेनमधील एकल सर्वात मोठी खेळाडू म्हणून उदयास आली आहे आणि या मार्केट सेगमेंटमध्ये अधिक सामर्थ्य व क्षमता आहे. हे अधिग्रहण सुझलॉन समूहाच्या आपल्या देशाच्या अक्षय ऊर्जा मालमत्तेचे रक्षण करताना वाढीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”
“आम्ही आयएसपी म्हणून रेनोमकडील सामर्थ्याची प्रशंसा करतो आणि आम्ही संजय घोडावत समूहाला अशा दूरदृष्टीने आणि बांधिलकीने निर्माण केल्याबद्दल प्रशंसा करतो. संजयजी घोडावत हे सुझलॉन समूहाचे दीर्घकाळ शुभचिंतक आहेत आणि आम्ही एसजीजीसोबत यशस्वी भागीदारीची अपेक्षा करतो.”
सुझलॉन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेपी चालसानी म्हणाले, “सुझलॉनमध्ये आम्ही आमच्या सेवा व्यवसाय अनेक दशकांपासून मन लावून, लक्ष केंद्रित करून उभा केला आहे. ऊर्जा संक्रमण घडविण्यात कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्या सुझलॉन सर्व्हिसेस बिझनेसने सुझलॉन-मेक टर्बाइनवर लक्ष केंद्रित केले आहेच आणि आता रेनोमचे नॉनसुझलॉन मल्टी ब्रँड रिन्युएबल एनर्जी ॲसेट्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, आम्ही भारतीय अक्षय ऊर्जा ओएमएस क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक स्थान निर्माण करत आहोत. पवनऊर्जा O&M स्पेसमध्ये सर्व मल्टी-मेक ग्राहकांना सर्वोत्तम-इन-क्लास ग्राहक सेवा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी विशेष आयएसपी म्हणून रेनोमला समर्थन व बळकट करण्याचा आमचा मानस आहे.”
“ताफ्याच्या आकाराच्या दृष्टीने रेनोमची उपस्थिती लक्षणीय आहे. स्वतंत्र सेवा प्रदाता (“ISP”) म्हणून पवन ऊर्जा O&M उद्योगातील आगामी संधी काबीज करण्यासाठी एक मजबूत दावेदार बनवितो.
सुझलॉन समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी हिमांशू मोदी म्हणाले, “रेनोमचे अधिग्रहण सुझलॉन समूहात एक मौल्यवान भर घालत आहे. सुझलॉनचे कौशल्य, रणनीती आणि बाजारपेठेतील पोहोच यांना पूरक असलेले आयएसपी मार्केटमध्ये रेनोमचे नेतृत्व स्थान व रेनोमचा ताफा हे नफा अनेक पटीने वाढविण्यात मदत करू शकते. हे अधिग्रहण प्रकल्प, प्रतिभा, स्थाने आणि प्रणाली आणि प्रक्रियांच्या क्रॉसओव्हरच्या दृष्टीने समन्वय प्रदान करते, ज्यामुळे सुझलॉन ब्रँडचा फायदा घेण्याची संधी निर्माण होते व 29 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेला वारसा असलेल्या रेनोमला मार्केट लीडर म्हणून पुढे उभे होण्याची संधी मिळते.
“भारताच्या अक्षय ऊर्जा उद्योगाचे भविष्य वेगाने वाढीसाठी सज्ज आहे. सुझलॉन समूहामध्ये आम्ही एकत्रित, परंतु स्वतंत्र मालमत्ता आणि कंपन्या मिळविण्याचा व तयार करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामुळे आम्हाला या क्षेत्राचे सर्वसमावेशक नेतृत्व करण्यात मदत होईल.
संजय घोडावत ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, “गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत आम्ही रेनोमला आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बनविले आहे. सुझलॉन समूहासोबत जोडले जाण्याचा आमचा उद्देश हा आहे की, ब्रँड म्हणून रेनोमची अनेक पटींनी वाढ होत राहील आणि आमच्या विद्यमान व नवीन ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळेल. या धोरणात्मक वाटचालीमुळे रेनोमला सुझलॉन समूहासोबत वाढण्यासाठी प्लॅटफॉर्म तर मिळतोच, पण एसजीजीला त्याच्या एव्हिएशन, एज्युकेशन, कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि रिटेल या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची अनुमती मिळते. मला खात्री आहे की, सुझलॉन समूह रेनोमला आणखी उंचीवर नेईल.”
