Saturday, September 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रविवारी आदित्य ठाकरे परभणीच्या दुष्काळ दौऱ्यावर

 

-टाकळी कुंभकर्ण येथे करणार दुष्काळाची पाहणी

परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे रविवारी (दि. २७) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे रविवारी सकाळी ११ वाजता ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी तसेच शेतीच्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. या दौऱ्यात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार डॉ. राहुल पाटील तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading