Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

निक्की अन् अरबाजमध्ये अभिजीतमुळे दुरावा येणार?

Bigg Boss Marathi New Season Day 27 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सीझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता अभिजीतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात दुरावा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. अरबाजने याबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला म्हणत आहे,”तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुम्ही एकमेकांसोबत दिवसभर बोला”.

निक्की पुढे अभिजीतला म्हणते,”त्याचं म्हणंन हेच आहे की आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत. तर तू का नाही आहेस?”. तर दुसरीकडे अरबाज अंकिताला म्हणतो,”अभिजीत समोर असेल तर कृपया मध्ये येऊ नकोस. आता मी भिडणार”. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला चांगलीच खटकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘BIGG BOSS मराठी, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading