उंदरांमुळे पाकिस्तानी संसदेच्या कामकाजात व्यत्यय
इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या संसदेत (Pakistan Parliament) उंदरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून संसद भवनात प्रशिक्षित मांजरांची फौज तैनात केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाचे वादळ घोंगावत आहे. सरकार ओझाखाली दबले आहे तर नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अवस्थेतच पाकिस्तानी संसद एका वेगळ्याच समस्येने ग्रासली आहे.
पाकिस्तानी संसद भवनात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदरांमुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. त्याचप्रमाणे संसदेची महत्त्वाची कागदपत्र उंदरांनी नष्ट केली आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संसद भवनात प्रशिक्षित मांजरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
