Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Badlapur child abuse case : सरकार नालायक आहे – मनोज जरांगे पाटील          

अंतरवाली सराटी : बदलापूर (Badlapur child abuse case) येथे दोन चार वर्षांच्या चिमूकल्यांवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतत्प पालकांनी केलेलेल्या रेल्वे रोको आंदोलन हे राजकीय दृष्टीने प्रेरीत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जात आहे. मात्र, अशा प्रकारचे आरोप करणारे सरकार हे नालायक असून; त्यांच्यात माणुसकी नसल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, बदलापूरमध्ये ज्या दोन चिमुकल्यांवर लैगिक अत्याचार झाले, त्याबाबद संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ पालकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले. याला सरकारला राजकीय वास येत आहे. तसेच हे आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरीत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जात आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सरकारच्या नालायक पनाचे हे लक्षण आहे. या सरकारमध्ये थोडीही माणुसकी राहिलेली नाही. अशा सरकारला जनतेने घरी बसवायला हवे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

निवडणूक लढवण्या संदर्भात दोन महिन्यात 

विधानसभा निवडणुक लढवायची की पाडायची याबाबतची अधिकृत भूमिका ही मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यात स्पष्ट करणार होते. मात्र केंद्र सरकारने राज्यातील विधासभा निवडणुका पुढे ढकल्याने निवडणुक लढवायची की पाडायची याबाबतची अधिकृत भूमिका येत्या दोन महिन्यात आपण स्पष्ट करू, असे आज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading