स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!
पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित तिसर्या ‘स्पोटर्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमी संघाने सलग तिसरा विजय तर, स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हित कारीया याच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीने मिलेनियम नॅशनल स्कूलचा ८ गडी राखून सहज पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मिलेनियम नॅशनल स्कूलचा डाव ९९ धावांवर गडगडला. स्वराज पोकळे याने एकहाती ३५ धावा केल्या. हित कारीया याने ९ धावात ३ गडी बाद केले. रेयान पॉल यानेही २ गडी बाद केले. हे लक्ष्य स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीने १६.३ षटकामध्ये आणि २ गडी गमावून पूर्ण केले. पृथ्वीराज जाधव (नाबाद २५ धावा), ऋत्विक पारेख (२५ धावा) आणि युवराज पाटील (नाबाद २५ धावा) यांच्या फलंदाजीने संघाने सहज विजय साकार केला.
अर्थव बोडखे याने फटकावलेल्या १६२ धावांच्या जोरावर स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीने मेट्रो क्रिकेट अॅकॅडमी संघाचा १३६ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीने २६४ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अर्थव बोडखे याने ९३ चेंडूत २७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १६२ धावांची खेळी केली. विहान चोरेरा याने ३२ धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर मेट्रो क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १२८ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मिलेनियम नॅशनल स्कूलः ३० षटकात १० गडी बाद ९९ धावा (स्वराज पोकळे ३५, हित कारीया ३-९, रेयान पॉल २-२४) पराभूत वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीः १६.३ षटकात २ गडी बाद १०२ धावा (पृथ्वीराज जाधव नाबाद २५, ऋत्विक पारेख २५, युवराज पाटील नाबाद २५, अर्थ साबळे १-२०); सामनावीरः हित कारीया;
स्पार्क क्रिकेट अॅकॅडमीः ३० षटकात ७ गडी बाद २६४ धावा (अर्थव बोडखे नाबाद १६२ (९३, २७ चौकार, ३ षटकार), विहान चोरेरा ३२, सतिश खेडकर २-१६);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी अर्थव आणि इशान यांच्यामध्ये ६६ (५७) वि.वि. मेट्रो क्रिकेट अॅकॅडमीः ३० षटकात ८ गडी बाद १२८ धावा (सतिश खेडकर २९, अरीहंत फुलझेले २९, प्रज्ञयान गायकवाड २-६, सौम्या भामरे २-४); सामनावीरः अर्थव बोडखे;
